ETV Bharat / bharat

कारखान्याचे छत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू, दोन जण जखमी - Six injured in Delhi house collapse

पश्चिम दिल्लीतील ख्याला गावात शनिवारी सकाळी कारखान्याचे छत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले. ख्यालाच्या विष्णू बागेत सकाळी दहाच्या सुमारास मोटर वाइंडिंगच्या कारखान्यात ही घटना घडली. त्या वेळी, तेथे सहा जण आत होते.

कारखान्याचे छत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू

author img

By

Published : Dec 19, 2020, 7:02 PM IST

नवी दिल्ली - पश्चिम दिल्लीतील ख्याला गावात शनिवारी सकाळी कारखान्याचे छत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले. ख्यालाच्या विष्णू बागेत सकाळी दहाच्या सुमारास मोटर वाइंडिंगच्या कारखान्यात ही घटना घडली. त्या वेळी, तेथे सहा जण आत होते.

अपघाततील सहा जखमींना पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका कर्मचारी, डीडीएमएच्या कर्मचार्‍यांनी वाचवले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. सहापैकी चार जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर, दोघांची स्थिती धोक्याबाहेर असल्याची माहिती दिल्ली पश्चिमचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त सुबोध कुमार गोस्वामी यांनी दिली.

कारखान्याचे छत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू

हेही वाचा - कोविड-१९: ऑटोमेशन आणि रोजगारांचा ऱ्हास

'ही इमारत गौटर/तुकविलाने बनविली गेली होती आणि तेथे जास्त प्रमाणात साहित्य-सामग्री भरून ठेवली होती. यामुळे येथे झालेल्या अडचणीत लोक अडकले होते,' असे दिल्ली अग्निशामक विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले.

घटनेच्या वेळी कारखान्यात सहा मजूर काम करत होते. जखमींना तातडीने जीजीएस आणि डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. रमेश (35), चीना (36), गुड्डी (45) आणि ट्विंकल (25) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर, रवी (20) आणि गुड्डू कुमार (18) जखमी झाले.

घटनेची माहिती एसडीएम पटेल नगर येथे देण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.