कांकेर छत्तीसगडच्या कांकेरमध्ये पत्नीकडून पतीचा खून करण्यात आला आहे kanker murder case . या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे Three accused of murder of youth arrested in Kanker . पत्निचे मोठ्या भावासोबत अनैतिक संबंध होते. त्या कारणामुळे त्यांच्यात वाद होत होते. अखेर त्या वादाचे मारहाणीत रूपांतर झाले आणि पत्नीने दिराच्या आणि जावेच्या मदतीने पतीचा खून केला wife killed husband in Kanker . कांकेरच्या माकडी-कोकडी रस्त्यावर ही हत्येची घटना घडली. बुधवारी ही घटना उघडकीस आली.
पतीची हत्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनी अशा तीन आरोपींना 36 तासांत अटक केली आहे. पत्नी आणि मोठा भाऊ यांच्यातील अनैतिक संबंध हे हत्येचे मुख्य कारण होते. यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणे होत होती. श्रीकांत सोनी असे मृत इसमाचे नाव आहे. त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या. हत्येच्या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. नातेवाईकांच्या चौकशीत साम्य न आढळल्याने पोलिसांना नातेवाइकांवर संशय आला. त्याशिवाय सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातूनही पोलिसांनी नातेवाईकांविरोधात पुरावे आढळले. त्याआधारे पोलिसांनी पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला अटक केली. अद्याप एक आरोपूी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
हत्येचे कारण श्रीकांत सोनी हा त्याचा मोठा भाऊ सूर्यकांत, मेहुणी योगेश्वरी सोनी, पत्नी चंद्रिका सोनी एकाच घरात राहत होता. 1 वर्षापूर्वी चंद्रिका आणि मृत श्रीकांत सोनी यांनी लग्न केले होते. हे जोडपे धमतरी येथे राहत होते. श्रीकांत हॉटेलमध्ये काम करायचा, त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. चंद्रिकाला छोटया गोष्टीवरून शिवीगाळ व मारहाण करायचा. वहिनी हार विकण्यासाठी रोज घरातून बाहेर पडायची. श्रीकांत पत्नी आणि त्याचा मोठा भाऊ घरात राहत होते. त्यांच्या वाढत्या जवळीकामुळे दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले. थोड्या दिवसांनी श्रीकांतला पत्नीवर संशय आला. त्यादिवशी त्याने तिघांशी भांडण केले. त्यानंतर आरोपी चंद्रिका सोनी, सूर्यकांत सोनी उर्फ अविनाश आणि योगेश्वरी यांनी मिळून श्रीकांतच्या हत्येचा कट रचला. कट रचून तिघेही श्रीकांतसोबत दंतेवाडीला रवाना झाले. परत येताना तिघांनीही श्रीकांतची हातोड्याने व चाकूने हत्या केली. त्यानंतर, मृतदेह वाटेत फेकून दिला.
हेही वाचा - Monkey In Honeytrap माकडीणीच्या आमिषाला बळी पडत माकड सापडले हनीट्रॅपमध्ये