ETV Bharat / bharat

Assassins of Atiq Ahmad: अल कायदाच्या धमकीनंतर अतिकच्या मारेकऱ्यांची सुरक्षा वाढवली, पोलीस यंत्रणाही सतर्क

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दहशतवादी संघटना अल कायदाच्या नावाने देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

Assassins of Atiq Ahmad
पोलीस ठाणे
author img

By

Published : Apr 22, 2023, 9:06 PM IST

जयपुर (राजस्थान) : दहशतवादी संघटना अल कायदाच्या नावाने उत्तर प्रदेशात अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी देण्यात आली आहे. अल कायदाच्या नावाने 7 पानी मासिक जारी करून या हत्याकांडाचा बदला घेण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राजस्थान पोलीस आणि सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजस्थान पोलीस मुख्यालयाकडून लक्ष ठेवले जात आहे. आयबी, एटीएस आणि एसओजीला अलर्ट करण्यात आले आहे. या धमकीमध्ये बिहार हिंसाचाराचाही उल्लेख करण्यात आला आहे.

अल-कायदाच्या नावाने धमकी : डीजीपी उमेश मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, राजस्थानच्या सर्व सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर आहेत. राज्यातील संवेदनशील भागांवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. ही धमकी दहशतवादी संघटना अल-कायदाच्या नावाने देण्यात आली होती की अन्य कोणत्या संघटनेने दिली होती, याचाही तपास करण्यात येत आहे. डीजीपी उमेश मिश्रा यांनी या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी एटीएस-एसओजी एडीजी अशोक राठौर यांच्यावर सोपवली आहे. त्याचवेळी, एडीजी अशोक राठोड यांनी या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे सांगितले आहे.

हत्येचा लाइव्ह व्हिडिओ : 15 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली होती. पोलीस संरक्षणादरम्यान दोघांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येचा लाइव्ह व्हिडिओही समोर आला होता. अरुण मौर्य, सनी आणि लवकेश तिवारी यांच्यावर हत्येचा आरोप आहे. अतिक आणि अश्रफ मीडियाशी बोलत असताना, ही घटना घडली. यादरम्यान तिघांनीही गोळीबार करून हत्येची घटना घडवली होती. उत्तर प्रदेश पोलीस या हत्येचा तपास करत आहेत. यापूर्वी अतिक अहमद यांच्या मुलाचा एन्काउंटर झाला होता.

अमेरिकेसह इतर देशांनाही धमकी दिली : अल कायदाच्या नावाने बदला घेण्याची धमकी दिल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलीस आणि सरकार या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. इतकेच नाही तर दहशतवादी संघटना अल कायदाच्या नावाने भारताशिवाय इतर देशांना धमक्याही देण्यात आल्या आहेत. अल कायदाने चीन, बांगलादेश, सौदी, अमेरिकेसह इतर देशांनाही धमकी दिली आहे. बिहार आणि काश्मीरमध्ये मुस्लिमांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे या धमकीमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : Sanjay Singh Sent Notice To Ed : खासदार संजय सिंह यांची ईडी अधिकाऱ्यांना नोटीस, म्हणाले 24 तासात..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.