ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी व यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी..

पंतप्रधान नरेंद्र मोदी व यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बॉम्बहल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. 112 कंट्रोल रूमच्या ट्विटर हँडलवरून ही धमकी देण्यात आली आहे. धमकीचा हा मेसेज आल्यानंतर याचा क्राइम ब्रांचकडे तपास सोपविण्यात आला आहे.

threat-to-kill-pm-modi-
threat-to-kill-pm-modi-
author img

By

Published : Nov 7, 2021, 8:52 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. 112 कंट्रोल रूमच्या ट्विटर हँडलवरून ही धमकी देण्यात आली आहे. धमकीचा हा मेसेज आल्यानंतर याचा क्राइम ब्रांचकडे तपास सोपविण्यात आला आहे. दिवाळीच्या दिवशी 112 कंट्रोल रूमच्या ट्विटर हँडलवर दीपक शर्मा नावाच्या अकाउंटवरून मेसेज आला होता.

या मेसेजमध्ये पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यासंदर्भात लिहिण्यात आले होते. एवढेच नाही, तर या ट्विटमध्ये इतरही काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास डीसीपी पीके तिवारी यांच्या नेतृत्वात केला जात आहे. धमकी मिळून दोन दिवस झाले तरी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डायल 112 वर दीपक शर्मा नावाने बनवण्यात आलेल्या टि्वटर हँडलवरून पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस या ट्विटर अकाउंट होल्डरला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. जेसीपींच्या मते धमकी देणाऱ्याला लवकरच अटक करण्यात येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.