नवी दिल्ली - महाराष्ट्र टास्क फोर्सने कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिल्यानंतर एम्सनेही हा तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. जर कोरोनाच्या काळात योग्य नियमांचे पालन करणे व गर्दी टाळणे नाही केल्यास कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. येत्या सहा ते आठ आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी दिला आहे.
ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण वाढत आहे, त्या ठिकाणी क्षेत्रनिहाय कठोर लॉकडाऊन करावे, असे मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याचे दाखविणारी आकडेवारी अद्याप समोर आली नाही, असेही गुलेरिया यांनी सांगितले. आर्थिक चलनवलन लक्षात घेता राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन हा पर्याय नाही. मोठ्या प्रमाणात लसीकरण, कोरोनाच्या काळात नियमांचे योग्य पालन हे अधिक करण्याची गरज असल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.
हेही वाचा-मुंबईत तीन मुलांनी म्यूकरमायकोसिसमुळे गमावले डोळे
कोरोनाची दुसरी लाट ओसरली!
नुकतेच, भारतामधील महामारीतज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट टळू शकणार नसल्याचे संकेत दिले होते. ही लाट सप्टेंबर ते ऑक्टोबरपासून येईल, असे महामारीतज्ज्ञांनी म्हटले होते. कोरोनाची लाट भारतामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात आल्यानंतर देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसह कोरोनावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. सध्या, देशातील नवीन कोरोनाबाधितांचे व कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. रोज ४ लाखांहून आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या काही दिवसांपासून ६० हजारापर्यंत खाली आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या देशात ७,६०,०१९ कोरोनाचे रुग्ण आहेत. हे गेल्या ७४ दिवसांमधील सर्वात कमी प्रमाण आहे. देशातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा हा ३,८५,१३७ आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये १,६४७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनामधून बरे होण्याचा दर हा ९६.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपा आमने सामने, कुडाळमध्ये पोलीस छावणीचे स्वरूप
टास्क फोर्स'ने दिला 'हा' इशारा
कोरोनाची दुसरी लाट आता कुठे नियंत्रणात येते न येते तोच आता लवकरच तिसरी लाट येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्सने दिला आहे. येत्या दोन आठवड्यात तिसरी लाट येणार असून यात १० टक्के लहान मुले बाधित होतील असेही टास्क फोर्सने म्हटले आहे. तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येणार असल्याचे म्हटले जात असताना आता टास्क फोर्सने जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यातच तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. तर या लाटेत सक्रिय रुग्णांचा आकडा ८ लाखांपर्यंत जाईल. सक्रिय रुग्णांमध्ये १० टक्के रुग्ण हे ० ते १८ वयोगटातील असतील असाही इशारा टास्क फोर्सने दिला आहे.
हेही वाचा-Third Wave वर राज्य आणि केंद्रीय टास्क फोर्समध्ये मतभिन्नता, केंद्र म्हणतंय- तिसरी लाट येणारच नाही
मार्च २०२० पासून देशात कोरोनाचा शिरकाव-
मार्च २०२० मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाचा कहर प्रचंड वाढला. हजारो रुग्ण कॊरोनाचे बळी ठरले. डिसेंबर मध्ये दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली. पण मार्च २०२१ मध्ये कोरोनाचा कहर पुन्हा वाढला. रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. मृत्यूदर वाढला. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तिसरी लाट नियंत्रणात आणली आहे. रुग्ण संख्या कमी होत आहे.