ETV Bharat / bharat

Thieves Stole Jewelry : ज्वेलरी शोरूम फोडली, 25 कोटी रुपयांच्या दागिन्यावर चोरट्यांनी मारला डल्ला - ज्वेलरी शोरूममध्ये करोडोंची चोरी

Thieves stole jewelry : दिल्लीतील एका ज्वेलरी शोरूममध्ये करोडोंची चोरी झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. जंगपुरा परिसरात असलेल्या ज्वेलरी शोरूममध्ये रात्री उशिरा ही घटना घडली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. शोरूममध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस तपासत आहेत.

Thieves Stole Jewelry
Thieves Stole Jewelry
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 6:24 PM IST

चोरट्यांनी दागिने चोरून नेले

नवी दिल्ली Thieves stole jewelry : दिल्लीतील हजरत निजामुद्दीन पोलीस स्टेशन हद्दीतील जंगपुरा भागात एका दागिन्यांच्या शोरूममध्ये चोरीची मोठी घटना घडली आहे. उमराव ज्वेलर्स येथे कोट्यवधींची चोरी झाली आहे. 20-25 कोटी रुपयांची चोरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी दुकानात ठेवलेले दागिने लंपास केले आहेत. या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शोरूममध्ये लावलेल्या आजूबाजूच्या सीसीटीव्हीची छाननी केली जात आहे.

  • दुकान मालिक ने बताया, "हम रविवार को दुकान बंद कर के गए थे और मंगलवार की सुबह जब दुकान खोली तो हमें पूरी दुकान में धूल दिखाई दी। पता लगाने पर पता चला कि चोरों ने स्ट्रांग रूम की दीवार में गड्ढा कर सामान चोरी किया है। करीब 20-25 करोड़ का सामान चोरी हुआ जिसमें 5-7 लाख रुपए नकद भी… pic.twitter.com/FRFPSvl1QQ

    — ANI_HindiNews (@AHindinews) September 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

20 ते 25 कोटी रुपयांचे दागिने लंपास : या संदर्भात सूत्रांचं म्हणणं आहे की, चोरट्यांनी सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांचे दागिने पळवून नेले आहेत. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी याबाबत काहीही माहिती दिलेली नाहीये. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आज सकाळी शोरूम उघडलं असता शोरूम मालकाला संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली. उमराव ज्वेलर्स यांच्या घराचं छत तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून संपूर्ण दागिन्यावर हात साफ केला.

पोलीस घटनास्थळी दाखल : माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचं पोलीस पथक, पीसीआर पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर गुन्हे पथक, फॉरेन्सिक टीमला तपासासाठी घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पोलिसांचं पथक बाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. याशिवाय तांत्रिक मदत घेतली जात आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जिल्ह्याच्या ऑपरेशन सेलची टीमही तैनात करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांंचा संताप : कोट्यवधींच्या चोरीच्या या प्रकरणाबाबत व्यापाऱ्यांंनी संताप व्यक्त केलाय. सातत्यानं होत असलेल्या चोऱ्यांबाबत ज्वेलर्स असोसिएशनही लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. मात्र, या प्रकरणाबाबत दक्षिण पूर्व जिल्ह्याचे डीसीपी राजेश देव यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

भिंतीला पाडलं भगदाड : दुकानमालकानं सांगितले की, आम्ही रविवारी दुकान बंद केलं होतं. मंगळवारी सकाळी दुकान उघडलं असता, दुकानात दागिने चोरीला गेल्याचं लक्षात आलं. चोरट्यांनी दुकानात भगदाड पाडून आत प्रवेश केला होता. स्ट्राँगरूममधून 5 ते 7 लाखांच्या रोख रकमेसह 20-25 कोटी रुपयांचा माल चोरीला गेला आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचंही नुकसान केलं आहे. आता पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. Khalistani Shelter in Nanded : 'एनआयए'कडून गँगस्टर्सची यादी जाहीर; नांदेडात आश्रय घेण्याची शक्यता, पोलीस सतर्क
  2. Nashik Cyber Crime : इन्स्टाग्रामवरील 'ड्रीम गर्ल'कडून तरुणाची २ लाखांची फसवणूक, 'हे' टाळा अन्यथा तुम्हालाही वाटेल पश्चाताप
  3. Naeem Khan Murder : गोबरवाई येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ मोक्का आरोपी नईम खान याची गोळ्या झाडून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.