ETV Bharat / bharat

Dil Se Desi ही पर्यटन स्थळे करतात पर्यटकांना आकर्षित - tourist destinations attract tourists

पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडतात तर पावसाळ्यात फिरण्यास अनुकूल असलेल्या एका पर्यटन स्थळाविषयी आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पाच पर्यटनस्थळ महाबळेश्वर पाचगणी लोणावळा खंडाळा माथेरान पर्यटकांच्या पसंतीचे स्थळे राहिली आहेत. या विषयी थोड्याक्यात जाणून घेऊया माहिती.

tourist destinations
पर्यटन स्थळे
author img

By

Published : Aug 12, 2022, 11:51 AM IST

Updated : Aug 12, 2022, 1:04 PM IST

महाबळेश्वर - महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ हे सातारा जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून 1353 मीटरवर महाबळेश्वर वसले आहे. डोंगर, दऱ्या, पठारं आणि मैदानं यांनी सजलेले महाबळेश्वर वर्षानुवर्षं पर्यटकांच्या पसंतीचे स्थळ राहिले आहे. धाडसी ट्रेक आणि निसर्गाचा आनंद लुटायचा असेल, तर महाबळेश्वर हा पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. महाबळेश्वर Mahabaleshwar आणि त्याच्या आसपासच्या परिसरात अनेक अशी ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही जाऊ शकता आणि पर्यटनाचा चौफेर आनंद लुटू शकता. मे महिन्यात येथे स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल देखील भरला जातो.

पाचगणी - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. Panchgani महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि. मी. अंतरावर आहे. लोणावळा - खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लॅंड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील टेबल लॅंड वर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेले आहे. पूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर येऊन हे डोंगर तयार झाले असावे, असे मानले जाते. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झाल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे असे मानले जाते.

लोणावळा - हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे. पुण्यामुंबईपासून जवळ असल्याने सुट्टीच्या दिवशी रोजच्या घाईगर्दीतून थोडा वेळ बाजूला काढून पर्यटकांची पावले लोणावळयाकडे वळल्याशिवाय राहत नाहीत. मुंबईपासून लोणावळा 110 तर पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, Lonavla खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत. येथून दोन किलोमीटरवर कैवल्यधाम हा आश्रम आहे. येथे योगिक उपचारांसोबतच संशोधन व योग प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. लोणावळयानजीक मळवलीवरुन कार्ले व भाजे लेणी अगदी पाच दहा किलोमीटर अंतरावर आहेत. येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे.

खंडाळा - भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पश्चिम घाटात खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुणे जिल्यातील लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणापासून साधारण ३ कि.मी.(१.९ मैल) आणि कर्जतपासून साधारण ७ कि.मी.(४.३ मैल) अंतरावर खंडाळा आहे. कोंकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीतील बोर घाट जेथे संपतो ते ठिकाण म्हणजे खंडाळा. Khandala उत्तर बाजूस खोल दरी आणि दक्षिण बाजूस सह्याद्री पर्वताचा उंच पहाड याच्या मध्यभागी खंडाळा गाव वसलेले आहे. गावाच्या उत्तर बाजूने मुंबई-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग व भारतीय रेल्वे मार्ग जातो. खंडाळा स्टेशन हे कोकण प्रांतातील कर्जत स्टेशननंतर थांबा असणारे स्थानक आहे. खंडाळा १८.४४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.२१ अंश पूर्व रेखांशावर वसलेले आहे. मुंबई, पुणे व इतर जवळच्या शहरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येऊन पिकनिकचा आनंद लुटतात.

माथेरान - रायगड जिल्यातील थंड हवेचे ठिकाण माथेरान Matheran बाराही महिने पर्यटनासाठी खुले, थंडगार, सर्वदूर हिरवा पाचू पसरलेले अशा माथेरान ला पावसाळ्यात मात्र मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. माथेरान पुणे शहरापासून 90 किलोमीटर तर मुंबई पासून 110 किलोमीटर आहे. जर तुम्ही तुमचा प्रवास रेल्वेने करत असाल तर नेरुळ पाशी तुम्हाला स्वर्ग अनुभवायला मिळतो. माथेरानला वर्षभर तशी पर्यटकांची गर्दी असते, परंतु माथेरानचा आनंद घेण्याचा सर्वात सुंदर ऋतू म्हणजे पावसाळा कारण कणखर सह्याद्रीच्या दऱ्यामध्ये पसरलेलं धुकं, तरंगणारे ढग, ओलसर हवामान या गोष्टी अंगात वेगळेच रोमांच उभे करतात. माथेरान मध्ये फिरण्यासाठी एकूण 38 पॉईंट आहेत. प्रत्येक पॉईंट ची स्वतःची अशी वेगळी खासियत आहे. त्यामुळेच माथेरान पाहायला दरवर्षी गर्दी होते. त्यातच माऊंट बेरी आणि शारलोट लेकमुळे तर माथेरान च्या सौंदर्यात अजून जास्त भर पाडते.

हेही वाचा :Indian Independence Day येरवडा तुरुंगामधून देशातील पहिल्या जेल टुरिझम उपक्रमाला सुरुवात

Last Updated : Aug 12, 2022, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.