ETV Bharat / bharat

रामायणात महान मुत्सद्दी आहेत, राजकारणाबाबत बरंच काही शिकायला मिळतं - एस जयशंकर

S Jaishankar : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आज दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला संबोधित करताना रामायण आणि त्यातून मिळणारे याजकारणाचे धडे याबद्दल बोलले. "रामायणात महान मुत्सद्दी आहेत आणि प्रत्येक रामाला लक्ष्मणाची आवश्यकता आहे", असं ते म्हणाले.

S Jaishankar
S Jaishankar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 10:19 PM IST

नवी दिल्ली S Jaishankar : परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज (३ जानेवारी) नवी दिल्लीत त्यांच्या 'व्हाय इंडिया मॅटर्स' या पुस्तकाचं प्रकाशन केलं. यावेळी ते रामायण आणि त्यातून दिले जाणारे राजकारणाचे धडे, याबाबत बोलले.

रामायणातून राजकारणाबाबत शिकायला मिळतं : "रामायणात महान मुत्सद्दी आहेत. मग तो हनुमान असो की अंगद. तसेच प्रत्येक रामाला लक्ष्मणाची गरज असते. प्रत्येक मित्राला सहकाऱ्यांची आवश्यकता असते. त्यामुळे सहकाऱ्यांना महत्त्व आहे", असं जयशंकर म्हणाले. "रामायणातून आपल्याला राजकारणाबाबत बरंच काही शिकायला मिळतं. मग ती मुत्सद्देगिरी असो, दबावाला सामोरं जाणं असो किंवा मित्रपक्षांचं महत्त्व असो", असं जयशंकर यावेळी म्हणाले.

भारताच्या परराष्ट्र धोरणात बदल : गेल्या 10 वर्षात भारताच्या परराष्ट्र धोरणात बदल झाल्याचं एस जयशंकर म्हणाले. गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही भारताच्या परराष्ट्र धोरणात बदलाचं दशक पाहिलं. या दशकात जागतिक राजकारणात खूप मोठे बदल झालेत. यात भारताचं स्थान विशेष आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणं, तसेच एलएसीवर चीनशी व्यवहार करण्याचा मार्गात झालेला बदल, याद्वारे नवं परराष्ट्र धोरण आकाराला आल्याचं ते म्हणाले.

जगात अनेक भू-राजकीय बदल : "युक्रेन आणि गाझामधील युद्धांमुळे लाखो लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं. यामुळे जगाला अनेक भू-राजकीय बदलांचा सामना करावा लागतोय. गेल्या पाच वर्षांत देशाला कोविड, अफगाणिस्तान, युक्रेन, पश्चिम आशिया, मध्य पूर्व आणि हवामानाच्या परिणामांसह अनेक धक्क्यांचा सामना करावा लागला. मात्र या वर्षांत भारतानं प्रचंड विकास साधला", असं जयशंकर यांनी नमूद केलं.

हे वाचलंत का :

  1. 'तीसरी बार मोदी सरकार', लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा नवा नारा
  2. केंद्र सरकारचा धाडसी निर्णय! जम्मू-काश्मीरमधील 'या' दहशतवादी संघटनेवर बंदी
  3. ईशान्य भारतातील अशांतता होणार कमी; 'या' फुटीरतावादी संघटनेनं केली शांतता करारावर स्वाक्षरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.