पटना - बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाचे (लोजपा) अध्यक्ष चिराग पासवान यांना मोठा धक्का बसला आहे. चिराग यांच्या पक्षामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. लोजपाच्या पाच खासदारांनी पशुपती कुमार पारस यांना आपला नेते स्वीकारले आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत चाललेल्या लोजपा खासदारांच्या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. यानंतर पाचही खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्रही लिहले आहे. आम्हाला स्वतंत्र मान्यता मिळावी, अशी यामध्ये मागणी करण्यात आली आहे.
आता यांचे मार्ग वेगळे..
लोजपा खासदार पशुपती कुमार पारस, चौधरी महबूब अली कैसर, वीणा सिंह, चंदन सिंह आणि प्रिंस राज यांचे मार्ग चिराग यांच्यापासून वेगळे झाले आहेत. आज हे खासदार निवडणूक आयोगालाही माहिती देणार आहेत.
पारस यांना खासदारांनी का निवडले?
पारस लोजपा खासदारांमध्ये सर्वात वरिष्ठ आहे. ते रामविलास पासवान यांचे छोटे भाऊ आहे. पाच खासदारांच्या निर्णयानंतर लोजपामध्ये मोठ्या वादाची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच लोजपाचे अनेक नेते जदयूमध्ये सामील झाले आहे. पक्षामध्ये या धक्क्यानंतर लोजपा आणखी कमकुवत होणार आहे. पशुपती पारस यांच्यासोबत मोठ्या संख्येने नेते आणि समर्थकही लोजपातून बंड करू शकतात.
केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात पुशपती पारस
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा तीव्र होत आहे. असेही सांगितले जात आहे, की पारस केंद्रात मंत्री होऊ शकतात. 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी पुन्हा पदभार स्वीकारला तेव्हा मित्रपरिषदेमध्ये मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात येईल, असा फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. त्यानंतर 16 खासदार असलेले जेडीयू मंत्रीपरिषदेमध्ये सामील झाले नाहीत. त्यांनी किमान दोन जागांची मागणी केली होती. रामविलास पासवान 6 खासदारांसह एलजेपीचे मंत्री झाले. परंतु बिहार विधानसभा निवडणुकीच्या अगोदर रामविलास पासवान यांचे निधन झाले होते.
हेही वाचा - 'मी राजकारणात येण्यासाठी सध्या तयार नाही'