गांधीनगर : गुजरातमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम असे ठेवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचा लोकार्पण सोहळा पार पडला.
सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडियम असे नाव आधी या स्टेडियमला देण्यात आले होते. मात्र, आता हे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम नावाने ओळखले जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येथे सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्टस् एन्क्लेव्हचीही पायाभरणी करण्यात आली. राष्ट्रपतींच्या हस्ते या जागेचे भूमीपूजन करण्यात आले. विविधी खेळांच्या सुविधा एन्क्लेवमध्ये करण्यात येणार आहेत.
हे स्टेडियम ६३ एकर जागेवर पसरले असून त्यास तयार करण्यास ८०० कोटी रुपये लागले आहेत. सुमारे १ लाख ३२ हजार प्रेक्षकांना सामावून घेईल, येवढे मोठे स्टेडियम आहे. ऑस्ट्रेलियातील ९० हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या मेलबर्न स्टेडियमला नरेंद्र मोदी स्टेडियमने मागे टाकले आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियमचा मान यास मिळाला आहे.