ETV Bharat / bharat

Jayalalithaa Death Case: जयललिता यांचा मृत्यू संशयास्पद; अरुमुगासामी चौकशी समितीचा अहवाल - AIADMK

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि (AIADMK) नेत्या जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी नवे खुलासे समोर आले आहेत. अरुमुगासामी चौकशी समितीचा अहवाल आज मंगळवार (दि. 18 ऑक्टोबर)रोजी तामिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला. जयललिता यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा 5 डिसेंबर रोजी करण्यात आली, तर अरुमुगासामी आयोगाने पुराव्याच्या आधारे 4 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

जयललिता यांचा मृत्यू संशयास्पद
जयललिता यांचा मृत्यू संशयास्पद
author img

By

Published : Oct 18, 2022, 10:00 PM IST

चेन्नई (तामिळनाडू) - तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि (AIADMK) नेत्या जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी नवे खुलासे समोर आले आहेत. अरुमुगासामी चौकशी समितीचा अहवाल आज मंगळवार (दि. 18 ऑक्टोबर)रोजी तामिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला. जयललिता यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा 5 डिसेंबर रोजी करण्यात आली, तर अरुमुगासामी आयोगाने पुराव्याच्या आधारे 4 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

ही समिती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि (AIADMK)नेत्या जे जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करत होती. विधानसभेत सादर केलेल्या अहवालानुसार, शशिकला यांच्यासह तत्कालीन आरोग्य सचिव राधाकृष्णन यांनी केएस शिवकुमार आणि तत्कालीन आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांच्याविरोधात चौकशीची शिफारस केली आहे. समितीने सादर केलेल्या अहवालात दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची वेळ लक्षणीय असून त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. जयललिता यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा 5 डिसेंबर रोजी करण्यात आली, तर अरुमुगासामी आयोगाने पुराव्याच्या आधारे 4 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची वेळ 5 डिसेंबर 2016 रोजी रात्री 11:30 वाजता रुग्णालयाने अधिकृतपणे घोषीत केले. जयललिता यांच्या अखेरच्या काळात हॉस्पिटलमध्ये त्यांची देखभाल करणाऱ्या पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची साक्ष यावेळपेक्षा खूपच वेगळी आहे. 04.12.16 रोजी दुपारी 3.50 च्या आधी दिवंगत मुख्यमंत्र्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. अहवालात म्हटले आहे, की त्यांच्या प्रकृतीचे निरीक्षण करणाऱ्या परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्तव्यदक्ष डॉक्टरांनी स्पष्टपणे साक्ष दिली आहे, की 04.12.16 रोजी दुपारी 3:50 नंतर हृदयाची क्रिया झाली नाही आणि रक्त प्रवाह नाही असही त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

अरुमुगासामी आयोगाने जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी शशिकला आणि इतरांविरुद्ध चौकशीची शिफारस केली आहे. समितीच्या अहवालात शशिकला आणि इतरांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शशिकला यांना जयललिता यांच्या 'पोस इस्टेट' या घरातून हाकलून देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. 2012 मध्ये जयललिता यांच्यासोबत पुनर्मिलन झाल्यापासून दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते. घटनांच्या साखळीच्या आधारे, उक्त आयोग शशिकला यांना दोषी ठरवण्याव्यतिरिक्त कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकला नाही. आयोगाने शशिकला यांच्या चौकशीची शिफारस केली आहे.

चौकशी आयोगाने जयललिता यांच्या उपचारावरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. डॉक्टर सुमीन शर्मा यांच्या शिफारशीनंतरही जयललिता यांची अँजिओग्राफी का करण्यात आली नाही? डॉक्टर रिचर्ड पील यांनी तिला उपचारासाठी परदेशात नेण्यास तयार असल्याचे सांगितल्यानंतरही असे का झाले नाही? असे प्रश्न चौकशी समितीने उपस्थित केले आहेत. योग्य उपचार झाले असते तर जयललिता यांचे प्राण वाचू शकले असते, असेही तपास अहवालात म्हटले आहे. सप्टेंबर 2016 मध्ये जयललिता बेशुद्ध झाल्यापासून सर्वकाही संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे.

5 डिसेंबर 2016 रोजी चेन्नई येथील रुग्णालयात जयललिता यांच्या निधनानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश ए अरुमुगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी चौकशी आयोग स्थापन करण्यात आला. यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनीही जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी अनेकदा केली होती. जयललिता यांना मृत्यूपूर्वी कोणालाही भेटू दिले नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्यासोबत त्यांची सहकारी शशिकला हॉस्पिटलमध्ये होती. याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.