ETV Bharat / bharat

Uttarakhand Election 2022 : उत्तराखंडमध्ये मतदार राजाचा कौल कुणाला, हरीश रावत यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला

देवभूमी, अशी ओळख असलेल्या उत्तराखंड राज्याच्या विधानसभेसाठी झालेल्या मतदानाचे निकाल गुरुवारी (दि. 10 मार्च) जाहीर होणार आहेत. विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झाले होते. त्यावेळी एकूण मतदारांपैकी 65.10 टक्के मतदारांनी आपले मतदानाचे हक्क बजावले. 70 जागांसाठी एकूण 632 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 62 महिला आपले नशिब आजमावत ( Election 2022 )आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 10, 2022, 8:10 AM IST

Updated : Mar 10, 2022, 8:51 AM IST

हैदराबाद - देवभूमी, अशी ओळख असलेल्या उत्तराखंड राज्याच्या विधानसभेसाठी झालेल्या मतदानाचे निकाल गुरुवारी (दि. 10 मार्च) जाहीर होणार आहेत. विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झाले होते. त्यावेळी एकूण मतदारांपैकी 65.10 टक्के मतदारांनी आपले मतदानाचे हक्क बजावले. 70 जागांसाठी एकूण 632 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 62 महिला आपले नशिब आजमावत ( Election 2022 ) आहेत.

आतापर्यंतच्या मतदारांची आकडेवारी
आतापर्यंतच्या मतदारांची आकडेवारी

'इतके' झाले मतदान - राज्यात 81 लाख 72 हजार 173 मतदार आहेत. त्यापैकी 53 लाख 42 हजार 462 मतदारांनी मतदान केले. टक्केवारीचा पाहिली तर 2022 म्हणजेच यंदाच्यावर्षी 65.10 टक्के मतदान झाले. 2017 साली 65.60 टक्के तर 2012 साली 67.22 टक्के मतदान मतदान झाले होते. यंदा हरिद्वार जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 74.77 टक्के मतदान झाले तर सर्वात कमी 53.71 टक्के मतदान अल्मोडा जिल्ह्यात झाले आहे. 2012 साली काँग्रेसने बहुमत सिद्ध करत आपली सत्ता स्थापन केली होती तर 2017 भाजपने सत्ता स्थापन केली होती.

या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला - या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज, बंशीधर भगत, अरविंद पांडेय, सुबोध उनियाल, यतीश्वरानंद व विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल, बिशन सिंह चुफाल, डॉ. धन सिंह रावत, रेखा आर्य या भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री हरीश रावत, विरोधी पक्ष नते प्रीतम सिंह, माजी मंत्री यशपाल आर्य, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यातील जातीय समीकरण
राज्यातील जातीय समीकरण

चुरशीची लढत - विधानसभेच्या 70 जागांसाठी 632 जण रिंगणात उतरल्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची ठरत झाली आहे. सुमारे 40 ते 45 जागेसाठी भाजप व काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत होती. 25 ते 30 जागांसाठी तिहेरी लढत झाली. तसेच काही ठिकाणी बहुजन समाज पक्ष, उत्तराखंड क्रांती दल, आप व अपक्ष उमेदवारांमुळे या निवडणुकीतील चुरस आणखी पहायला मिळाली.

तब्बल 252 उमेदवार आहेत कोट्यधीश - 632 उमेदवारांपैकी तब्बल 252 उमेदरवार हे कोट्यधीश आहे. त्यापैकी सर्वाधिक कोट्यधीश उमेदवार हे भाजप पक्षाचे आहे. भाजपातील 60 उमेदवार कोट्यधीश असून काँग्रेसमधील 57 उमेदवार कोट्यधीश आहेत तर आम आदमी पक्षात 31 व बहुजन समाज पक्षाचे 18 उमेदवार कोट्यधीश आहेत.

काही महत्त्वाच्या लढती

गंगोत्री विधानसभा मतदारसंघ - उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री विधानसभा मतदारसंघात एकूण 68.01 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी आम आदमी पक्षाचे उमेदवार निवृत्त कर्नल अजय कोठियाल ( Ajay Kothiyal ) हे रिंगणात असून ते आपच्या मुख्यमंत्रीचा पदाचा चेहरा ( AAP ) आहे. या ठिकाणाहून ज्या पक्षाचा उमेदवार जिंकून येतो, त्याच पक्षाची सत्ता राज्यात बनते, असा इतिहास आहे. त्यामुळे या मतदारसंघावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

अजय कोठियाल यांची माहिती
अजय कोठियाल यांची माहिती

श्रीनगर विधानसभा मतदारसंघ - पौडी जिल्ह्यातील श्रीनगर मतदारसंघात 59.71 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी मंत्री धन सिंह रावत ( BJP Candidate Dhan singh Rawat ) व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल ( Congress Candidate Ganesh Godiyal ) या दोघांमध्ये मुकाबला आहे. भाजप व काँग्रेसचे प्रमुख नेते या ठिकाणी एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत.

लालकुआ विधानसभा मतदारसंघ - नैनीताल जिल्ह्यातील लालकुआ विधानसभा मतदारसंघावर सर्वांचे विशेष लक्ष लागून आहे. कारण, या ठिकाणाहून काँग्रेसचे दिग्गज नेते हरीश रावत स्वतः मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघात 72.56 टक्के मतदान झाले असून नैनिताल जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान याच मतदार संघात झाले आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आली तर आपणच मुख्यमंत्री असू, अशी घोषणाही हरीश रावत ( Harish Rawat ) यांनी केली आहे.

हरिश रावत यांची माहिती
हरिश रावत यांची माहिती

खटीमा विधानसभा मतदारसंघ - उधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ( Pushkar Singh Dhami ) हे मैदानात उतरले आहेत. या ठिकाणी 76.64 टक्के मतदान झाले असून जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान याच मतदार संघात झाले आहे. उधमसिंह नगर जिल्ह्यातील एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहेत.

पुष्कर सिंह धामी यांची माहिती
पुष्कर सिंह धामी यांची माहिती

हरिद्वार विधानसभा मतदारसंघ - हरिद्वार विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक ( Madan Kaushik ) हे रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातून 64.89 टक्के मतदान झाले आहेत. मात्र, हरिद्वार हे भाजपचे गड असून यात भाजप निवडून येण्याची दाट शक्यता आहे.

नैनिताल विधानसभा मतदारसंघ - या ठिकाणी भाजप व काँग्रेस, असे दोन्ही आयात उमेदवार आहेत. काँग्रेसकडून रिंगणात उभे असलेले संजीव आर्य हे 2017 साली भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. भाजपकडून रिंगणात असलेल्या सरिता आर्य या 2012 साली काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. यंदाच्या सरिता आर्य या काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीपूर्वी भाजपचे आमदार संजीव आर्य ( Sanjiv Arya ) यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने त्या नाराज होत्या. त्यामुळे सरिता आर्य यांनी भाजपात प्रवेश करत काँग्रेसला आव्हान उभे केले आहे.

लँसडाउन विधानसभा मतदारसंघ - अनुकृती गुसाईं ( Anukruti Gunsai ) पौडी गढवाल जिल्ह्यातील लँसडाउन विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचे मानले जात आहे. या ठिकाणाहून काँग्रेसचे बलाढ्य नेते हरक सिंह रावत ( Harak Singh Rawat ) यांची सून अनुकृती गुसाईं या मैदानात उतरल्या आहेत. स्टार उमेदवार म्हणून अनुकृती यांच्याकडे पाहिले जात आहे. त्या सॉफ्टवेअर इंजिनिअर असून 2013 पासून मॉडेलिंग करत आहेत. अनुकृति गुसाईं यांनी 2013 साली मिस इंडिया दिल्लीचा किताब पटकावला होता. 2014 साली मिस इंडिया पॅसिफिक वर्ल्ड व 2017 साली मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनल हा किताब पटकावला आहे. 2018 साली हरक सिंह रावत यांचा मुलगा तुषित रावत यांच्याशी अनुकृती यांनी लग्न केले. अनुकृती गुसाई यांचा मुकाबला भाजपचे उमेदवार दिलीप सिंह रावत यांच्याशी आहे.

भाजपची प्रचारसभा
भाजपची प्रचारसभा

प्रचारात भाजप अव्वल - यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनवत भाजपच्या दिग्गज नेत्यांनी देवभूमी उत्तराखंड येथे हजेरी लावली. भाजपकडून तब्बल 695 रॅली व सभा घेण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Union Minister Amit Shah ), रक्षामंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. नेहमी प्रमाणे यावेळीही नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी सर्वांच्या पुढे होते. 695 पैकी 151 सभा एकट्या मोदींनी घेतल्या. त्यापैकी 148 व्हर्च्युअल व 3 प्रत्यक्ष सभा झाल्या. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यात 177 प्रत्यक्ष सभा घेतल्या तर राज्यातील भाजप नेत्यांनी 280 प्रत्यक्ष व 87 व्हर्च्युअल सभा घेतल्या. काँग्रेसने 200 पेक्षा अधिक रॅली व प्रचार सभा घेतल्या असून काँग्रेसचे 30 स्टार प्रचारक मैदानात उतरले होते. त्यातील 21 स्टार प्रचारकांनी दोनशेहून अधिक सभा घेतल्या. राहुल गांधी व प्रियांका गांधी वाड्रा यांनी प्रत्येकी चार जनसभा घेतल्या. उत्तराखंडमधील काँग्रेसचे दिग्गज नेते हरीश रावत यांनी संपूर्ण म्हणजेच 70 विधानसभा मतदारसंघात व्हर्च्युअल सभा घेतल्या आहेत.

काँग्रेसची प्रचारसभा
काँग्रेसची प्रचारसभा

अनेक नेत्यांची असेल अखेरची निवडणूक - राज्यातील सुमारे डझनभर नेत्यांनी वयाची 65 वर्षे ओलांडली आहेत. त्यामुळे यंदाची ( Elections 2022 ) यामध्ये सर्वप्रथम नाव माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे आहे. रावत हे काँग्रेसचे दिग्गज व वरिष्ठ नेते असून ते स्वतः मुख्यमंत्री पदाचा दावेदार मानत आहेत. त्यांच्या वयानुसार त्यांची ही शेवटची निवडणूक असण्याची शक्यता आहे. गोविंद सिंह कुंजवाल, हीरा सिंह बिष्ट, दिनेश अग्रवाल, महेंद्र पाल, जोत सिंह बिष्ट, नवप्रभात, तिलकराज बेहड, मंत्री प्रसाद नैथानी, अशी नेतेही 65 वर्षे ओलांडली आहेत. या सर्वांसाठी यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर ते निवडणूक लढवतील की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. फक्त काँग्रेसच नाही तर भाजपातही असे अनेक चेहरे आहेत, ज्यांच्यासाठी ही निवडणूक वयामुळे शेवटची असू शकते. यानंतर हे नेते राजकीय संन्यास घेण्याची शक्यता आहे. मंत्री बंशीधर भगत, बिशन सिंह चुफाल, रामशरण नौटियाल यांसह यूकेडीतून दिवाकर भट्ट व काशी सिंह ऐरी यांची नावेही या यादीत आहेत.

2002 सालची मतांची टक्केवारी
2002 सालची मतांची टक्केवारी

मुस्लिम विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन करण्यात आला मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न - यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम विद्यापीठाच्या मुद्द्यावरून भाजप व काँग्रेसने मताचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्ना केला आहे. काँग्रेचे नेते हरीश रावत यांनी मुस्लिम विद्यापीठ उबारण्याचे आश्वासन देत राज्यातील मुस्लिम मतदरांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तर भाजपने याच मुद्द्यावर टीका करत हिंदू मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप नेत्यांचा कयास - उत्तराखंडमध्ये दोन मोठे पक्ष भाजप व काँग्रेस सरासरी 30 ते 35 टक्के मत आपल्याकडे वळवले आहे. पण, 2017 च्या निवडणुकीचे निकाल सर्वांना चकीत करणारे होते. भाजपने मतांच्या टक्केवारी उसळी घेतली होती. भाजपचे अनेक नेता आजही त्याच पद्धतीने कौल असेल, असा कयास लावत आहेत. 2017 साली भाजपच्या मतांची टक्केवारी 46 टक्के इतकी होती.

2007 सालची मतांची टक्केवारी
2007 सालची मतांची टक्केवारी

मतांचा आतापर्यंत वाटा - उत्तराखंडच्या पहिल्या विधानसभा निवडणूक 2002 मध्ये काँग्रेसने 36 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसला एकूण मतदानापैकी 26.91 टक्के मतं मिळाली होती. दूसऱ्या क्रमांकावर 19 जागा जिंकत भाजपने 25.45 टक्के मतं मिळवली होती. 2007 मध्ये भाजपने उसळी मारत 34 जागा काबीज केल्या होत्या.

2007 सालची मतांची टक्केवारी
2007 सालची मतांची टक्केवारी

2007 मध्ये भाजपची सत्ता - 2007 साली बाजपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे तत्कालिन उमेदवार जनक राज शर्मा यांचे प्रचारावेळी अपघात झाल्याने निधन झाले होते. त्यामळे बाजपूर विधानसभा मतदारसंघ वगळून उर्वरीत 69 जागांवर निवडणूक लढवण्यात आली होती. 2007 विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 31.90 टक्के मतं मिळवत 21 जागा जिंगल्या होत्या आणि सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसला 29.59 टक्के मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

2012 सालची मतांची टक्केवारी
2012 सालची मतांची टक्केवारी

2012 मध्ये काँग्रेसची सत्ता - 2012 मध्ये झालेल्या तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने भाजपला चितपट केले. काँग्रेसने 32 तर भाजपने 31 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी बसपचे तीन व अपक्ष तीन उमेदवारांची महत्तपूर्ण भूमिका होती. 2012 मध्ये 32 जागा मिळवत सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेसने राज्यातील 34.03 टक्के मतं मिळवली होती तर 31 जागा मिळवणाऱ्या भाजपने 33.13 टक्के मतं मिळवली होती.

मोदी लाटेची कमाल - भाजपने मोदी लाटेचा फायदा घेत 2017 मध्ये 57 जागा जिंकत प्रचंड बहुमताची सरकार स्थापन केली होती. त्यावेळी मोदी लाटेने विरोधकांना घरी बसवले होते. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत सिद्ध करणाऱ्या भाजपने 46.51 टक्के मतं मिळवली तर 11 जागांवर समाधान मानलेल्या काँग्रेसने 33.49 टक्के मतं मिळवली होती.

काँग्रेसचा दावा - उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मतांच्या टक्केवारीत चांगली उसळी घेतली होती. मात्र, यावेळी परिस्थिती उलट ठरणार आहे. गोदियाल म्हणाले, जितक्या जागांवर भाजप होते तेवढ्या जागा यंदा काँग्रेस मिळवेल व भाजपच्या जागा कमी होतील. मागील पाच वर्षांत भाजपने राज्यातील जनतेवर अन्याय केले आहे. त्यामुळे यंदा भाजपला राज्यातील जनता जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.

Last Updated : Mar 10, 2022, 8:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.