ETV Bharat / bharat

देव तारी त्याला कोण मारी..! बायकोला वाचवण्यासाठी नवरा आणि मित्राने मारली विहिरीत उडी, दोघांचाही मृत्यू बायको मात्र सुरक्षित - नवरा आणि मित्र दोघांचाही बुडून मृत्यू

विहीरत पत्नीने उडी मारली असे समजून नवऱ्याने तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. तेवढ्यात दोघांना वाचवण्यासाठी त्याच्या मित्रानेही विहिरीत उडी घेतली. या प्रकारात नवरा आणि मित्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. मात्र पत्नी सुखरूप वाचली आहे.

विहिरीत उडी
विहिरीत उडी
author img

By

Published : Apr 24, 2023, 12:43 PM IST

खम्मम : देव तारी त्याला कोण मारी अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याचाच प्रत्यय आता तेलंगाणामध्ये आला आहे. ही घटना खम्मम जिल्ह्यातील आहे. तिथे रविवारी रात्री एक दुःखद घटना घडली. पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर पत्नीने विहिरीत उडी घेतली असे पतीला वाटले. त्यामुळे पतीनेही तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याला पोहायला येत नाही हे माहीत नसलेल्या त्याच्या मित्राने त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र त्याचाही बुडून मृत्यू झाला. खम्मम जिल्ह्यातील नेलाकोंडापल्ली मंडल येथे रविवारी रात्री ही घटना घडली.

अप्पलानरसिंहपुरम गावात राहणारे कार्लापुडी नागराजू आणि रमाना हे जोडपे रविवारी एका क्षुल्लक कारणावरून भाडले. या भांडणामुळे पत्नी चांगलीच वैतागली. आता मी विहिरीत उडी मारून जीवच देते असे बडबडत ती घराबाहेर पडली. आता दुखावलेलीळे पत्नी रमणा विहिरीत उडी मारून मरेल अशी भीती तिच्या पतीला वाटू लागली. कारण ती रागाने बडबडतच घराबाहेर पडली होती. तिचा पती नागराजू तिच्या मागा मागे गेला पण त्याला ती काही सापडलीच नाही. त्याने पत्नाची खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र खूप वेळ झाला तरी ती काही सापडली नाही. मग त्याला वाटले तिने खरेच विहिरीत उडी मारली असावी. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी विहीरीत उडी मारायचा त्याने निर्णय घेतला. त्याला पोहता येत नसतानाही नागराजूने तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली.

नागराजूला पोहता येत नाही हे कळताच त्यांच्या शेजारी असलेला त्यांचा मित्र यंद्रती जोजी यानेही विहिरीत उडी घेतली. मात्र या प्रकारात दोघेही बुडून गेल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. स्थानिकांना त्यांचे मृतदेह विहिरीत सापडले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर बेपत्ता असलेल्या रमणाला शोधण्यासाठी स्थानिक लोकांचा आटापिटा सुरू झाला. तेव्हा त्यांना ती उभ्या पिकात, शेतामध्येच बसून रडताना आढळली. मग त्यांनी तिला तिच्या पतीच्या मृत्यूबद्दल सांगितले. त्याच्या मृत्यूची बातमी कळल्यावर रमणने टाहो फोडला. मात्र किरकोळ भांडणापोटी आपला पती गमावल्याची तिला आता जाणीव झाली होती. त्यापुढे ती काहीच करू शकत नव्हती.

हेही वाचा - Gates named after Tendulkar Lara: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर तेंडुलकर लारा यांच्या नावाच्या गेट्सचे अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.