ETV Bharat / bharat

विशेष : १५ वर्षापूर्वीच्या घटनेनं आझाद आणि मोदींच्या डोळ्यात अश्रू, पीडित जरीवाला कुटुंबीयांशी खास चर्चा - पंतप्रधान मोदी राज्यसभा भाषण

जरीवाला कुटुंबीय अद्यापही चिमुकल्यांना गमावल्याच्या दु:खात आहे. ईटीव्ही भारतने जरीवाला कुटुंबीयांशी खास चर्चा केली. यावेळी सगळ्यांनी या घटनेची आठवण काढताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 11, 2021, 12:08 PM IST

अहमदाबाद - सुरतमधील जरीवाला कुटुंबातील ३६ सदस्य जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनास गेले होते. २५ मे २००६ ला दुचाकीवरून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी जरीवाला परिवाराच्या बसवर ग्रेनेड हल्ला केला. ज्या ठिकाणी ग्रेनेड पडले तेथे या कुटुंबातील चार बालके होती. ८ वर्षांचा रॉबिन राकेशकुमार जरीवाला, १६ वर्षांची खूशबू जरीवाला, ८ वर्षाचा फेनिल जरीवाला आणि १६ वर्षाची शुखबू जरीवाला या हल्ल्यात ठार झाले. संपूर्ण देशभरात या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात आली होती. नुकतेच संसदेतून गुलाम नबी आझाद निवृत्त होत असताना पंतप्रधान मोदींनी या दुखद घटनेच्या आठवणी ताज्या केल्या.

१५ वर्षानंतर संसदेत दुखद घटनेच्या आठवणींना उजाळा -

या दहशतवादी हल्ल्याची आठवण काढताना गुलाम नबी आझाद आणि पंतप्रधान मोदी दोघांचेही डोळे पाणावले होते. २००६ साली जेव्ही ही घटना घडली होती तेव्ही पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तर गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. या हल्ल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची आठवण मोदींनी करून दिली. त्यावेळी चार मुलांचे मृतदेह आणि इतर सदस्यांना वायू दलाच्या विशेष विमानाने गुजरातला माघारी आणण्यात आले होते. या घटनेला १५ वर्ष उलटून गेली मात्र, जरीवाला कुटुंबीय अद्यापही चिमुकल्यांना गमावल्याच्या दु:खात आहे. ईटीव्ही भारतने जरीवाला कुटुंबीयांशी खास चर्चा केली. यावेळी सगळ्यांनी या घटनेची आठवण काढताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

जरीवाला कुटुंबीयांनी दिला आठवणींना उजाळा

संसदेत घटनेचा उल्लेख होईल, अशी कल्पना केली नव्हती -

आम्ही कोणीही कल्पना केली नव्हती की, १५ वर्षांनंतर संसदेत या घटनेचा उल्लेख होईल. या घटनेची आठवण काढणारे दुसरे कोणी नसून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी असती. पंतप्रधान या घटनेची आठवण काढून गहीवरले. गुलाम नबी आझाद यांनीही या दहशतवादी हल्ल्याची आठवण काढली. दोन्ही नेत्यांना तशीच्या तशी ही घटना माहिती आहे. हे पाहून जरीवाला कुटुंबाने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

नरेंद्र मोदी आणि आझाद यांनी आम्हाला धीर दिला होता -

जरीवाल कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदी आणि आझाद दोघांचेही आभार मानले. या घटनेत मृत्यू झालेल्या रॉबिनच्या आईने म्हटले की, पंतप्रधान मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. या घटनेनंतर त्यांनी आम्हाला बोलावून घेतले होते. तसेच ते सुरतला येऊन अंत्यसंस्कास उपस्थित राहिले होते. मोदीजींनी आम्हाला धीर दिला होता. आपली १६ वर्षाची मुलगी गमावलेल्या नरेंद्र जरीवाला यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सतत मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या संपर्कात होते. त्यांच्याशी चर्चा करत होते. त्यामुळे आमच्या मुलांचे मृतदेह विशेष विमानाने गुजरातला आणण्यात आले. मोदींशी फोनवर चर्चा करताना आझाद यांनी रडू कोसळले होते.

खुशबूच्या आईने म्हटले की, जेव्हा पंतप्रधान मोदींनी संसदेत या घटनेची आठवण काढली, तेव्हा कुटुंबातील आम्हा सर्वांना रडू कोसळले. त्यावेळी आम्हाला जी मदत करण्यात आली ती आताच्या नेत्याला जमली नसती. आज ते आमच्या कुटुंबातील सदस्यासारखे भावूक झाले. गुलाम नबी आझाद आमच्या सोबत वडोदराला आले होते. ते सतत आम्हाल पाणी पिण्यात देत होते. तसेच धीर देत होते. त्यांनी आमची खूप काळजी घेतली होती.

चार बालके गमावल्याने कुटुंबीय आजही धक्क्यात -

या हल्ल्यात जीव गमावलेल्या फेनिल या मुलीची आई योगिता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. आजही त्या व्यथित आणि उदास दिसत होत्या. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूमुळे संसदेतही भावनिक वातावरण झाल्याने कुटुंबीय गहीवरून गेले. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली म्हणून स्मारक उभारण्यात आले आहे. २००६ सालच्या हल्ल्यात चार मुलांच्या हत्येला सुरत शहर अद्यापही विसरले नाही. शहरातील गोपीपुरा भागात हे स्मारक उभारण्या आले असून त्यावर घटनेची माहिती लिहण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.