ETV Bharat / bharat

CDS Rawat Funeral : सीडीएस बिपीन रावत यांच्यावर लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील रावत यांच्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघून कामराज मार्गावरून ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत (Funeral From Kamraj Marg) पोहोचेल. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

author img

By

Published : Dec 10, 2021, 9:42 AM IST

Updated : Dec 10, 2021, 12:20 PM IST

CDS Rawat
सीडीएस बिपीन रावत

नवी दिल्ली: तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात (chopper crash Tamil Nadu) मृत्युमुखी पडलेल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता लष्करी इतमामात दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार (Funeral Procession CDS Rawat) करण्यात येणार आहेत. दुपारी २ नंतर कामराज मार्गावरून अंत्ययात्रा निघून ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत पोहोचेल.

जनरल रावत यांच्या कामराज मार्गावरील निवासस्थानी दुपारी 11 ते 12.30 च्या दरम्यान नागरिकांना अंत्यदर्शन घेता येईल. तर, दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत लष्कराचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण करता येणार आहे. हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जनरल रावत आणि इतरांचे पार्थिव गुरुवारी सुलूरहून दिल्लीतील पालम एअरबेसवर आणण्यात आले. तत्पूर्वी, तामिळनाडूतील नीलगिरी जिल्ह्यातल्या वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमधून मद्रास रेजिमेंटल सेंटरमध्ये त्यांचे पार्थिव आणण्यात आले होते. तेथून पार्थिव सुलूर एअरबेसवर नेण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम एअरबेसवर जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अपघातात मृत्युमुखी पावलेल्या इतर 11 जणांना श्रद्धांजली (PM Modi Tributes CDS Rawat) वाहिली. बुधवारी तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 जणांच्या मृत्यूमुळे जगभरातील विविध देशांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला.

11.50 - हेलिकॉप्टर अपघातात आपला जीव गमावलेले भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना विविध देशांच्या लष्करी दूतांनी श्रद्धांजली वाहिली.

  • Military attaches of different countries paid tribute to India's first CDS Gen Bipin Rawat who lost his life in the IAF chopper crash on Wednesday pic.twitter.com/0iSrCOycY3

    — ANI (@ANI) December 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

11.45 - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

11.16 - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली वाहिली

  • Congress leader Rahul Gandhi pays tributes to CDS General Bipin Rawat, his wife Madhulika Rawat who lost their lives in the IAF chopper crash on Wednesday pic.twitter.com/ZjloO9gPgm

Last Updated : Dec 10, 2021, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.