ETV Bharat / sports

5600 दिवसांत पहिल्यांदाच 'असं' घडलं; दक्षिण आफ्रिकेनं केला सर्वात मोठा 'अपसेट'

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाचा एक मोठा विक्रम मोडला गेला आहे. गेल्या 15 वर्षांत प्रथमच कांगारु महिला संघ T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करु शकला नाही.

SAW in Final
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 18, 2024, 9:42 AM IST

Updated : Oct 18, 2024, 11:33 AM IST

दुबई SAW in Final : ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना गुरुवारी (17 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात आफ्रिकन संघानं 8 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे महिला T20 विश्वचषक स्पर्धेत आफ्रिकेनं प्रथमच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. तर गेल्या 15 वर्षांत (5600 दिवस) कांगारु महिला संघाला T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेवटच्या साखळी सामन्यात कांगारुंनी भारताचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

रविवारी होणार अंतिम सामना : महिला T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी (18 ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज महिला संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. महिला T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (20 ऑगस्ट) दुबईत होणार आहे.

सहा वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा बाहेर : यावेळी महिला T20 विश्वचषकात असं काही घडलं आहे, जे यापूर्वी 2009 च्या मोसमात घडलं होतं. वास्तविक, 2009 पासून आतापर्यंत 8 महिला T20 विश्वचषक झाले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियानं 6 जिंकले आहेत. त्यांना फक्त एकदा 2016 च्या मोसमाच्या अंतिम फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 2009 च्या मोसमात ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत पराभूत होऊन बाहेर पडला होता. यानंतर कांगारु संघ अंतिम फेरीत पोहोचू शकलेला नाही हे दुसऱ्यांदा घडलं आहे. यावेळी चोकर्स नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं इतिहास रचला आहे.

आफ्रिकेनं कसा केला कांगारुंचा पराभव : या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कांगारु संघानं 5 गडी गमावून 134 धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज बेथ मुनीनं संघाकडून सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. तर एलिस पेरीनं 31 आणि कर्णधार ताहिला मॅकग्रानं 27 धावा केल्या. यानंतर 135 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेनं 17.2 षटकांत 2 गडी गमावून सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेसाठी ॲन बॉशनं 48 चेंडूत सर्वाधिक नाबाद 74 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली. तर कर्णधार लॉरा वोल्वार्डनंही 42 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकन महिला संघाचा T20 विश्वचषकातील सर्वात मोठा विजय :

  • 135 धावा - विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला - दुबई - 2024
  • 124 धावा - विरुद्ध इंग्लंड मध्यम - पर्थ - 2020
  • 119 धावा - वि. वेस्ट इंडिज महिला - दुबई - 2024
  • 115 धावा - वि न्यूझीलंड महिला - सिल्हेट - 2014
  • 114 धावा - विरुद्ध बांगलादेश महिला - केपटाऊन - 2023

हेही वाचा :

  1. भारतीय संघ 46 धावांत गारद... मात्र न्यूझीलंडच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा लज्जास्पद विक्रम
  2. दोन विश्वविजेत्यांमध्ये कोण होणार विजेता...? निर्णायक T20 सामना भारतात 'इथं' पाहा लाईव्ह

Last Updated : Oct 18, 2024, 11:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.