ETV Bharat / bharat

Second Time Expansion : डॉ. प्रमोद सावंत सरकारचा आज खाते विस्तार

विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) सरकारच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा खाते विस्तार (The Expansion of Dr. Pramod Sawant's government today) होणार आहे. या विस्तारात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला (Maharashtra wadi Gomantak Paksha) स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Goa Assembly
गोवा विधानसभा
author img

By

Published : Apr 9, 2022, 9:49 AM IST

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्यानंतर भाजप सरकारचे दुसरे खाते वाटप आज होणार आहे. यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधान विधानसभा निवडणुकीत भाजपला गोव्यात सत्ता मिळाल्यानंतर भाजपच्या आठ ज्येष्ठ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर उर्वरित तीन मंत्र्यांचा शपथविधी बाकी होता. यात नेमके कोणाला स्थान मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

अखेर सर्व निर्णयावर एकमत झाले असून भाजपचे दोन तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांचा शपथविधी होणार आहे. भाजपकडून देवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर व सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई तसेच अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची पडू शकते. असे सांगितले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आमदारांनी ठिंबा दिला होता. भाजप कडून तिन अपक्ष आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. तूर्तास तरी हे शक्य होताना दिसत नाही त्यामुळे सर्वच अपक्ष आमदारांचा भ्रमनिरास झाल्याची भावणा निर्माण झाली आहे. तीन आमदारांचा आज दुपारी राजभवन येथील नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलमध्ये शपथविधी होणार असून या कार्यक्रमाला भाजप व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.