ETV Bharat / bharat

'मेरी आवाज ही मेरी पेहचान है' : दिल्ली सरकारने दिली संगीतमय कार्यक्रमातून लतादीदींना आदरांजली - साहित्य कला परिषद दिल्ली

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली देण्यासाठी 'मेरी आवाज ही मेरी पहचान है' ( meri awaz hi meri pahchan hai ) एक भव्य संगीतमय कार्यक्रमाचे कॅनॉट प्लेस के सेंट्रल पार्कमध्ये दिल्ली सरकारने आयोजन ( Delhi government paid homage to Lata Mangeshkar ) केले होते. गीतकार शिल्पाराव यांच्यासह अनेक कलाकारांचे संगीताच्या माध्यमातून लता दीदींना आदरांजली अर्पण केली. अभिनेता अन्नू कपूर ने कार्यक्रमात सुत्रसंचालन केले.

meri awaz hi meri pahchan hai
लतादीदींना आदरांजली
author img

By

Published : Feb 20, 2022, 4:13 AM IST

नवी दिल्ली - गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली देण्यासाठी 'मेरी आवाज ही मेरी पहचान है' ( meri awaz hi meri pahchan hai ) एक भव्य संगीतमय कार्यक्रमाचे कॅनॉट प्लेस के सेंट्रल पार्कमध्ये दिल्ली सरकारने आयोजन ( Delhi government paid homage to Lata Mangeshkar ) केले होते. गीतकार शिल्पाराव यांच्यासह अनेक कलाकारांचे संगीताच्या माध्यमातून लता दीदींना आदरांजली अर्पण केली. अभिनेता अन्नू कपूर ने कार्यक्रमात सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमात स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सीलेंस द्वारका येथील मुलांनीही आपल्या संगीतमय सादरीकरणाच्या माध्यमातून लता मंगेशकर यांना आदरांजली अर्पण केली.

'मेरी आवाज ही मेरी पहचान है' या कार्यक्रमातील सादरीकरण

'त्या देशाचा आवाज होत्या'

यावेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, लताजींसारखी महान व्यक्तिमत्त्व ही आपल्या देशाची शान आहे, त्या देशाचा आवाज होत्या आणि त्यांच्या आवाजामुळे त्या आपल्या सर्वांच्या हृदयात कायम अमर राहतील. आज या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्ली सरकार लताजींना दिल्लीतील तमाम नागरिकांच्या आणि देशातील तमाम कलाप्रेमींच्या वतीने विनम्र आदरांजली अर्पण करत आहे. ते म्हणाले की, लतादीदी आज आपल्या सर्वांमध्ये नाहीत. पण आम्हांला अभिमान वाटतो की, आम्ही त्या काळचे साक्षीदार आहेत जेव्हा त्या गात असत, आम्ही सर्वांनी त्यांना गाताना पाहिले आणि ऐकले.

दिल्ली पुन्हा संगीत कार्यक्रमाला सुरूवात -

कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर शनिवारी दिल्ली पुन्हा संगीत कार्यक्रमाला सुरूवात होत आहे. त्याची सुरुवात लताजींच्या आठवणीने करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लताजींच्या जीवनाशी संबंधित अनेक भाग एका व्हिडिओद्वारे दाखवण्यात आले. कधी लताजींच्या आवाजाने लोकांना देशभक्तीची प्रेरणा दिली तर कधी त्यांच्या आवाजाने लोकांना जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन दिले, हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

शिल्पा राव आणि अनु कपूर यांच्यासह अनेकांची उपस्थिती -

'मेरी आवाज ही मेरी पेहचान है' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार शिल्पा राव आणि अनु कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी संगीताच्या माध्यमातून लताजींची आठवण काढली. कार्यक्रमादरम्यान अभिनेता अनु कपूरने लताजींशी संबंधित अनेक किस्से शेअर केले. दिल्ली सरकारच्या कला संस्कृती आणि भाषा विभाग, दिल्ली पर्यटन विभाग आणि साहित्य कला परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हेही वाचा - Raj Thackeray : गोरेगावमध्ये राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.