ETV Bharat / bharat

नक्षलवादी सासऱ्याने जी शाळा बॉंम्बस्फोटने उडवली त्याच शाळेत सून झाली शिक्षिका

बिहारमधील जमुईमध्ये एक गाव आहे, जिथे लोकांनी नक्षलवाद्यांच्या भीतीने मुलांना शाळेत पाठवले नाही. मात्र, आज येथील चित्र पूर्णपणे बदलले आहे. (Naxalite Baleshwar Koda) मोठ्या संख्येने मुले शाळेत येतात. सर्वजण याचे श्रेय दहशतवादी नक्षलवादी बलेश्वर कोडाची सून रंजू देवी यांना देत आहेत.

नक्षलवादी सासऱ्याने जी शाळा बॉंम्बस्फोटने उडवली त्याच शाळेत सून झाली शिक्षिका
नक्षलवादी सासऱ्याने जी शाळा बॉंम्बस्फोटने उडवली त्याच शाळेत सून झाली शिक्षिका
author img

By

Published : Oct 1, 2022, 10:30 PM IST

Updated : Oct 1, 2022, 10:39 PM IST

जमुई (बिहार) - बिहारमधील जमुई येथील बालेश्वर कोडाचे नाव घेताच लोक आजही घाबरतात अशी परिस्थिती आहे. येथे अनेक मोठ्या घटना घडवून संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे. ( Naxalite Baleshwar Koda ) दहशत आणि दहशतीचा समानार्थी शब्द बनलेल्या बालेश्वर कोडाने अनेक शाळाही फोडल्या आहेत. पण आज त्याच एका शाळेत नक्षलवादी व्यक्तीची सून शिक्षणाचा दिवा जागवत आहे. रंजू देवी या वऱ्हाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अत्यंत नक्षलग्रस्त भाग असलेल्या चोरमारा येथील सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. त्या मुलांमध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरवत आहेत.

2007 मध्ये रंजू देवी यांचे सासरे नक्षलवादी बलेश्वर कोडा याने चोरमारा प्राथमिक शाळा उडवून दिली. त्यावेळी सर्व काही उद्ध्वस्त झाले. त्यावेळी येथे नक्षलवाद्यांची मोठी दहशत होती. मात्र, आज येथील चित्र बदलले आहे. ( Bahu of Naxalite became teacher in Jamui) सरकारी शाळेची इमारत नव्याने बांधण्यात आली आहे. आता नक्षलवादी बलेश्वर कोडा यांची सून आणि तुरुंगात असलेल्या संजय कोडाची पत्नी रंजू कोडा या शाळेत शिक्षिका आहेत. रंजू पूर्ण समर्पणाने मुलांना शिकवत आहेत. तसेच, आयुष्याचा योग्य मार्गावर चालण्याचे धडे देत आहेत.

खरे तर, बालेश्वर कोडा त्याच्या दोन साथीदारांसह जून 2022 मध्ये पोलिसांना शरण आला. त्याच्या आत्मसमर्पणानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि मुलांना शाळेत पाठवण्याचे मान्य केले. ( Prathmik Vidyalaya Chormara Jamui ) बालेश्वरच्या शरणागतीमध्ये रंजू कोडाचाही मोठा वाटा होता. त्याने सासरच्या मंडळींना आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्यासाठी राजी केले.

एक काळ असा होता की भीमाबांधच्या जंगलात चोरमारा गाव नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित मानले जात होते. कुख्यात नक्षलवादी बलेश्वर कोडाची प्रचंड दहशत होती. त्यावेळी मुंगेरचे तत्कालीन एसपी केसी सुरेंद्र बाबू याची गावापासून काही अंतरावर हत्या करण्यात आली होती. पण आता सर्व काही बदलले आहे. मुलं अभ्यास करत आहेत. काहीतरी बदल त्यांना आयुष्यात करायचा आहे. येथील महिलांनाही कामासह सन्मान मिळत आहे.

सध्या चोरमारा प्राथमिक शाळेत 186 मुले दाखल आहेत. मुलंही रोज शाळेत येतात आणि लोक रंजू देवी यांच्या प्रयत्नांना पूर्ण श्रेय देतात. काही महिन्यांपूर्वीपर्यंत येथील चित्र असे नव्हते. चोरमारा, गुरमाहा आणि इतर नक्षलग्रस्त गावातील लोकांनी सांगितले की, त्यांना मुलांना शिक्षण द्यायचे होते, पण नक्षलवाद्यांच्या भीतीने त्यांनी मुलांना शाळेत पाठवले नाही. शाळेत दोन शिक्षकही तैनात होते. मात्र, तेही नक्षलवाद्यांच्या भीतीने शाळेत आले नाहीत. त्यामुळे शाळा महिन्यातून एक-दोनदाच उघडायची आज ती कायम चालू आहे.

त्याचवेळी जमुईचे एसपी शौर्य सुमन यांनीही रंजूचे कौतुक केले आणि नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रशासन सतत कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. बालेश्वरची सून सतत प्रयत्नशील होती, त्यामुळेच आम्हाला एवढे मोठे यश मिळाले. प्रथम जिल्हा पोलीस आणि सीआरपीएफ परिसर नक्षलमुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न केले जातात. त्यानंतर विकास केला जातो असही ते म्हणाले आहेत.

बालेश्वर कोडाची दहशत पूर्व-बिहार, ईशान्य झारखंडच्या सीमावर्ती भागासह जमुई, मुंगेर आणि लखीसरायच्या सीमावर्ती भागात होती. एकेकाळी हा परिसर त्यांच्या नावाने हादरायचा. दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांचे मन वळवून आत्मसमर्पण केले, त्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 14 जुलै 2017 रोजी नक्षलवादी बलेश्वर कोडा-अर्जुन कोडा आणि त्याच्या संपूर्ण टोळीने बरहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुकुरझाप धरणात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केली होती. मुंगेरचे तत्कालीन एसपी केसी सुरेंद्र बाबू यांना उडवले होते. या प्रकरणात बालेश्वरचेही नाव पुढे आले होते.

Last Updated : Oct 1, 2022, 10:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.