आग्रा - टी-२० क्रिकेट विश्वचषकात ( T20 Cricket World Cup ) पाकिस्तान क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा ( Pakistan cricket teams victory ) केल्याचा आरोप असलेल्या तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मात्र, तरीही ते अजूनही तुरुंगात आहेत. याचे कारण त्यांच्यासाठी कोणताही स्थानिक व्यक्ती जामीनदार म्हणून पुढे यायला तयार नाही.
30 मार्च रोजी उच्च न्यायालयाने तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना जामीन मंजूर ( three Kashmiri students in jail ) केला होता. जगदीशपुरा पोलीस स्टेशनने ( Jagdishpura police station ) जानेवारी 2022 मध्ये आरोपी काश्मिरी विद्यार्थ्यांविरुद्ध सीजीएम न्यायालयात ( CGM court kashimiri students ) सरकारकडून परवानगी घेतल्यावर आरोपपत्र दाखल केले होते. 27 ऑक्टोबर 2021 पासून तीन आरोपी काश्मिरी विद्यार्थी तुरुंगात आहेत. काश्मिरी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील मधुबन दत्त चतुर्वेदी यांनी ( Advocate Madhuban Dutt Chaturvedi ) सांगितले की, उच्च न्यायालयात प्रदीर्घ खटला चाललल्यानंतर एकसदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश अजय भानोत यांनी 30 मार्च 2022 रोजी तीन आरोपी काश्मिरी विद्यार्थ्यांना जामीन मंजूर केला होता. जामीनपात्र आदेशही जारी केले होते.
जामीन मिळण्यास लागणार वेळ- एका काश्मिरी विद्यार्थ्याच्या सुटकेसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांसह दोन जामिनदारांची अट घातली होती. जामिनदार मिळत नसल्याने आरोपी काश्मिरी विद्यार्थ्यांची सुटका झाली नव्हती. अखेर काश्मीरमधून आग्रा येथे आलेल्या आरोपी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी सीजीएम न्यायालयात जामिनाची कागदपत्रे व जामिनाची रक्कम जमा केली आहे. वकील मधुवन दत्त चतुर्वेदी यांनी सांगितले की, सहापैकी चार जामीनदारांची वैयक्तिक स्थिती तपासण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन जामीनदारांच्या पडताळणीनंतर अहवाल येईल. त्यानंतर आरोपी काश्मिरी विद्यार्थ्यांना सोडण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना जामीन मिळण्यास अजून थोडा वेळ लागणार आहे.
असे आहे प्रकरण - 24 ऑक्टोबर 2021 रोजी दुबई येथे झालेल्या टी-20 क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानने भारतावर विजय मिळविला होता. आग्राच्या बिचपुरी येथील आरबीएस कॉलेजमध्ये शिकणारे काश्मिरी विद्यार्थी अर्शीद युसूफ, इनायत अल्ताफ शेख आणि शौकत अहमद गनी पाकिस्तानचा विजय साजरा केला. याचा फोटोही आरोपींनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकला होता. त्याचवेळी, ही छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर, जगदीशपुरा पोलिसांनी भाजप युवा मोर्चा महानगर अध्यक्ष शैलू पंडित यांच्या तक्रारीवरून काश्मिरी विद्यार्थी अर्शीद युसूफ, इनायत अल्ताफ शेख आणि शौकत अहमद गनी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपी काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक करून तुरुंगात पाठविले. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशावरून पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाची कलमेही लावली होती.
या कलमांखाली काश्मिरी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
- 153A: जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण हेतू, जो विविध धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट किंवा जाती, समुदाय यांच्या समरसतेच्या विरोधात आहे. सार्वजनिक शांतता भंग करण्यास कारणीभूत किंवा कारणीभूत होण्याची शक्यता आहे.
- 505(1)b: आरोपींवर खोट्या बातम्या पसरवणे. यामुळे कोणतीही व्यक्ती किंवा समाज किंवा राज्य गुन्हा करण्यास प्रवृत्त होऊ शकते.
- 66 FIT कायदा: सायबर दहशतवाद.
- 124A: देशद्रोह.
घटनांवर एक नजर
- 24 ऑक्टोबर रोजी बिचपुरी कॅम्पसमधील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर विजय मिळवल्यानंतर आनंद साजरा केल्याचा आरोप करण्यात आला.
- 25 ऑक्टोबर रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने आरोपी विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकले.
- विद्यार्थ्यांचे चॅटिंग आणि व्हॉट्सअॅप स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी जगदीशपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- 27 ऑक्टोबर रोजी चर्चेत देशद्रोहाचे कलम वाढवण्यात आले. तीनही आरोपी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.
- 28 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी विद्यार्थ्यांना न्यायालयात हजर केले. तेथून तिघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले.
- 30 मार्च 2022 रोजी उच्च न्यायालयाने तिन्ही काश्मिरी विद्यार्थ्यांना जामीन मंजूर केला.
हेही वाचा-Wife knife Attack On Husband : लपाछपीचा डाव, पत्नीचा पतीवर चाकूचा घाव
हेही वाचा- Today Petrol- Diesel Rates : महागाई सत्र! पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; वाचा आजचे दर
हेही वाचा- Eight Maoists Arrested In Chhattisgarh : विजापूर येथे जाळपोळ करणाऱ्या माओवाद्यांना अटक