हैदराबाद - उत्तरेकडील राज्यात दिवाळी सणाचे विशेष महत्व असते. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजा आणि पाडवा हे अगदी भक्तीभावाने साजरा करतात. दिवाळी येताच घराची साफसफाई आणि रंगरंगोटी केली जाते. ग्रामीण भागात चूल आणि भांड्यांना पिवळ्या मातीने लिंपण्यात येते. पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या वेळेस गरजेपुरती लागणारी सर्व भांडी बाहेर काढण्यात येतात. दिवाळीच्या वेळेस तुपापासून बनवलेले मालपुडे बनवले जातात.
सायंकाळी घरात खीर आणि गुजरी तसेच जलेबी मिठाईसाठी आणली जाते. सायंकाळी पूजेसाठी सर्व पैसे आणि दागदागिने देवघरात ठेऊन त्याची पूजा केली जाते. यानंतर घरी, दुकानात, गोदामात दिवे लावण्यात येतात. ग्रामीण भागात धनत्रयोदशीला नवे ट्रॅक्टर, मोटरसायकल, तसेच नवीन वाहनाची खरेदी केली जाते. दिवाळीला चारपाईच्या खाली शेणाने गोवर्धनची आकृती काढत त्याची पूजा केली जाते.
धनत्रयोदशी
धनत्रयोदशीला धन्वतंरी देवताची पूजा केली जाते. यावेळेस कडुनिंबाचे पानाचे बारीक केलेले तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून देतात. या दिवसाला सोन्याची, तसेच नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. कडुनिंबाला आरोग्याच्या दृष्टीने मोठे महत्व असल्याने प्रसाद म्हणून कडुनिंब दिले जाते.
लक्ष्मीपूजन
दिवाळी हा सण मांगल्य आणि पावित्र्याचा आहे. या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धन, सोन्याचे दागिने याची पूजा केली जाते. यावेळेस लक्ष्मीने राक्षसाचे दहन केले म्हणून त्यावेळेस लक्ष्मीचे पूजन केले जाते.
हेही वाचा - वोकल फॉर लोकल : 400 वर्षे पूर्वीची फटाके बनवण्याच्या पद्धतीचे पुनरुज्जीवन