ETV Bharat / bharat

Thane Lift Accident : ठाण्यातील लिफ्ट अपघातात बिहारमधील ४ मजुरांचा मृत्यू, कुटुंबियांचा ठाणे प्रशासनावर गंभीर आरोप, म्हणाले.. - Thane Lift Accident Four laborers of Bihar died

Thane Lift Accident : ठाण्यात ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात बिहारमधील चार मजुरांचा मृत्यू झाला. मात्र या मजुरांचे मृतदेह अद्यापही त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आलेले नाही. प्रशासनाकडून आम्हाला कुठलीही मदत मिळत नसल्याचा आरोप मजुरांच्या कुटुंबियांनी केला आहे. वाचा पूर्ण बातमी..

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 4:17 PM IST

Updated : Sep 11, 2023, 4:55 PM IST

समस्तीपूर (बिहार) Thane Lift Accident : ठाण्यात रविवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. येथे एका ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळून ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांपैकी चार जण बिहारमधील मजूर होते.

प्रशासनाकडून कोणताच आधार मिळत नसल्याचा आरोप : आता या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांनी ठाणे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला प्रशासनाकडून कोणताच आधार मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हे सर्व मजूर ४ सप्टेंबर रोजी बिहारमधून महाराष्ट्रात आले होते. त्यांना या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम मिळालं. दरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील लिफ्टची तार तुटल्यानं त्याखाली चिरडून या चौघांचाही मृत्यू झाला. रविवारी रात्री बांधकाम कंपनीकडून कुटुंबियांना ही माहिती मिळाली. मात्र अद्याप कोणताही प्रशासकीय कर्मचारी पीडित कुटुंबाला भेटण्यास गेलेला नाही.

Maharashtra lift accident
कुटुंबात शोकाचं वातावरण

या महिन्यात सर्व लोक मुंबईत कामावर गेले होते. रविवारी रात्री आम्हाला कन्स्ट्रक्शन कंपनीकडून फोन आला की, बांधकामाधीन इमारतीची लिफ्ट पडून चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. गावातील काही लोक मृतदेह आणण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. मात्र प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यांचे मृतदेह आणण्यासाठी कोणीही पावले उचलत नाही. घटनेनंतर आम्हाला भेटण्यासाठी कोणताही स्थानिक अधिकारी अद्याप गावात आलेला नाही. - पीडित कुटुंब

Maharashtra lift accident
कुटुंबात शोकाचं वातावरण

जिल्हा प्रशासनाकडून मृतांची पुष्टी नाही : स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, गावातील कारी दास, रूपेश कुमार, मंजेश कुमार आणि सुनील दास या चौघांचा या अपघातात मृत्यू झाला. मात्र, मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची कोणतीही यादी जिल्हा प्रशासनानं अद्याप जाहीर केलेली नाही. सर्व मृतांचे कुटुंबीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Maharashtra lift accident
कुटुंबात शोकाचं वातावरण

पीडितच्या कुटुंबीयांची मदतीची मागणी : घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य अमन कुमार यांनी गावात पोहोचून सर्व पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. त्यांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी बोलून पीडितच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी केली आहे. मात्र अद्याप एकाही मजुराचा मृतदेह गावात परत येऊ शकला नाही. या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी देखील मौन धारण केलं आहे.

हेही वाचा :

  1. Thane Lift Collapse : 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळून दुर्घटना, 7 कामगारांचा मृत्यू

Last Updated : Sep 11, 2023, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.