ETV Bharat / bharat

काश्मीर : पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीसह मुलीवर दहशतवाद्यांचा गोळीबार - Jammu Kashmir latest news

जम्म काश्मीर पोलीसच्या माहितीनुसार दहशतवादी हा जैश-ए-मोहम्मद गटाचा आहे. त्याचे नाव मुफ्ती अल्ताफ आहे. सुरक्षा दलाने परिसरात नाकाबंदी केली आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा शोध घेण्यात येत आहे.

Terrorists
Terrorists
author img

By

Published : Jul 21, 2021, 3:28 AM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबलची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे.

वेरीनागमध्ये दहशतवाद्यांनी पोलीस कॉन्स्टेबल सज्जाद अहमद मलिक यांची पत्नी व मुलीवर गोळीबार केल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार कोकारगुंड येथे पोलीस कॉन्स्टेबल सज्जाद मलिक यांच्या घरात दहशतवादी घुसले. त्यांनी मलिक यांची पत्नी नाहिदा जान आणि मुलगी मदीहा यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोघींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा-First bird flu death धक्कादायक! बर्ड फ्ल्यूने १२ वर्षाच्या मुलाचा दिल्लीत मृत्यू

जम्मू काश्मीर पोलीसच्या माहितीनुसार दहशतवादी हा जैश-ए-मोहम्मद गटाचा आहे. त्याचे नाव मुफ्ती अल्ताफ आहे. सुरक्षा दलाने परिसरात नाकाबंदी केली आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा शोध घेण्यात येत आहे.

नुकतेच दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील डाउनटाउनमधील परिसरात पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला होता. या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा-ऑक्सिजनच्या कमतरतेने मृत्यू झाले नाहीत- आरोग्य मंत्रालयाची राज्यसभेत माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.