ETV Bharat / bharat

Pulwama Police Murder : अतिरेक्यांनी घरात घुसून गोळीबार करत केली पोलीस कर्मचाऱ्याची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य सुरूच आहे. पुलवामा येथे शुक्रवारी दहशतवाद्यांनी एसपीओ रियाझ अहमद ठोकर ( SPO Riyaz Ahmad Thoker ) यांची गोळ्या ( terrorists fired on policeman in pulwama ) झाडून हत्या केली. यापूर्वी गुरुवारी बडगाममध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या केली ( Rahul Bhatt Murder ) होती.

Firing
गोळीबार
author img

By

Published : May 13, 2022, 1:03 PM IST

श्रीनगर ( जम्मू आणि काश्मीर ) : जम्मू-काश्मीरमध्ये काही काळ शांतता प्रस्थापित झाल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादी घटना वाढल्या आहेत. गुरुवारी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर ( Rahul Bhatt Murder ) दहशतवाद्यांनी आज पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर ( SPO Riyaz Ahmad Thoker ) यांची गोळ्या झाडून हत्या केली. रियाजच्या घरावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर रियाझ अहमद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू ( terrorists fired on policeman in pulwama ) झाला. खोऱ्यातील पुलवामा येथील गुडुरा भागात ही घटना घडली. काश्मीरमध्ये काही तासांतच टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ अहमद ठोकर हा त्याच्या गुडुरा येथील घरी उपस्थित होता. दरम्यान, दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले आणि गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात रियाझ अहमद यांची प्रकृती चिंताजनक होती.

काश्मिरी पंडितांची एक दिवसापूर्वीच हत्या : याच्या एक दिवस आधी दहशतवाद्यांनी महसूल विभागात तैनात राहुल भट्ट नावाच्या अधिकाऱ्याला लक्ष्य केले होते. तहसील कार्यालयात घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर दहशतवादी पळून गेले होते. राहुल भट्ट यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

अधिकारी म्हणाले की, पुलवामा येथील गुडारू भागात अतिरेक्यांनी गोळी झाडून जखमी केलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आज सकाळी अतिरेक्यांनी कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर यांच्यावर गुडूरा भागातील त्यांच्या निवासस्थानी गोळीबार केला. त्यानंतर त्यांना डीएच पुलवामा येथे हलवण्यात आले आणि येथील 92 बेस आर्मी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. जिथे त्याचा जखमी अवस्थेत मृत्यू झाला. याप्रकरणी आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, हल्ल्यानंतर लगेचच संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Rahul Bhat killing: काश्मीर खोऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी काश्मिरी पंडितांची निदर्शने.. राहुल भटच्या हत्येचा निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.