राजौरी : जम्मू-काश्मीरमधील ( Rajouris In Jammu kashmir ) राजौरी जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. ( Terrorist Granade Attack ) जिल्ह्यातील डांगरी गावात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. गेल्या 14 तासातील ही दुसरी घटना आहे. रविवारी संध्याकाळी संशयित दहशतवाद्यांनी एका विशिष्ट समुदायाच्या तीन घरांवर गोळीबार केला. या घटनेत चार जण ठार झाले, तर सहा जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ( Terrorist Granade Attack In Rajouris )
एका मुलाचा मृत्यू : एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, काल ज्या ठिकाणी स्फोट झाला होता, त्याच ठिकाणी आज स्फोट झाला. या स्फोटात जखमी झाल्याने एका मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी पाच जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु आणखी एक संशयित आयईडी आढळून आला, जो निकामी केला जात आहे. ( Terrorist Attack In Rajouris Jammu kashmir )
मृतांच्या कुटुंबीयांना एक्स-ग्रॅशिया जाहीर : जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा ( Lieutenant Governor Manoj Sinha ) यांनी सोमवारी राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि ठार झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. ( 10 lakhs each to the relatives announced ) एलजीच्या कार्यालयाने ट्विट केले की, 'राजौरीतील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मी लोकांना आश्वासन देतो की या भीषण हल्ल्यामागे असलेल्यांना कठोर शिक्षा केली जाईल. माझ्या संवेदना आणि प्रार्थना शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहेत. त्यांनी पुढे ट्विट केले की, 'भयंकर हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये एक्स-ग्रॅशिया आणि सरकारी नोकरी दिली जाईल. गंभीर जखमींना एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हल्ला : खोऱ्याच्या तुलनेत अत्यंत शांततापूर्ण असलेल्या जम्मू भागात गेल्या अनेक वर्षांतील हा पहिलाच हल्ला आहे आणि तोही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांनी संयुक्तपणे अप्पर डांगरी गावात गोळीबारात सहभागी असलेल्या दोन "सशस्त्र पुरुषांना" पकडण्यासाठी विस्तृत घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे, असे जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी सांगितले.
मृतांची नावे : अधिकाऱ्याने सांगितले की, सतीश कुमार (45), दीपक कुमार (23), प्रीतम लाल (57) आणि शिशुपाल (32) अशी मृतांची नावे आहेत. ते म्हणाले की, पवन कुमार (38), रोहित पंडित (27), सरोज बाला (35), रिदम शर्मा (17) आणि पवन कुमार (32) अशी जखमींची नावे आहेत. राजौरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मेहमूद यांनी गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्याची घोषना केली आहे. डांगरीचे सरपंच धीरज कुमार यांनी सांगितले की, संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा आवाज आला आणि नंतर मला फोनवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली.