ETV Bharat / bharat

Terror Alert In Punjab आयएसआय चंदीगड, मोहालीत दहशतवादी हल्ल्याच्या प्रयत्नात, सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट जारी - पंजाबमध्ये हल्ल्याचा आयएसआयचा प्रयत्न

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय चंदीगड आणि मोहालीवर हल्ला करण्यासाठी प्रयत्नात आहे ISI BACKED TERRORIST TARGETS CHANDIGARH AND MOHALI. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी पंजाब सरकारला ही माहिती दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे TERROR ALERT IN PUNJAB. दरम्यान, शीख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी 24 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहाली दौऱ्यापूर्वी एक व्हिडिओद्वारे इशारा जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्यात आली आहे.

TERROR ALERT IN PUNJAB
TERROR ALERT IN PUNJAB
author img

By

Published : Aug 21, 2022, 1:17 PM IST

चंदीगड केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी पंजाब सरकारला दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय चंदीगड आणि मोहालीवर हल्ला करण्यासाठी प्रयत्नात आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे TERROR ALERT IN PUNJAB.

गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी शीख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी 24 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहाली दौऱ्यापूर्वी एक व्हिडिओद्वारे इशारा दिला होता. त्यात त्यांनी म्हटले की, पूर्वी आम्ही पंजाबमधून पंतप्रधानांना माघारी फिरायला लावले होते. यावेळीही आम्ही त्यांना माघारी फिरायला लावू. ते म्हणाले की पंजाबमध्ये 26 जानेवारीला जनमत चाचणी होणार आहे, आणि आमचे कार्यकर्ते पंजाबमध्ये पोहोचतील.

दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्यांचा खुलासा काही दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी दिल्लीतून 4 दहशतवाद्यांना पकडले होते. यामध्ये दीपक, मोगा, सनी इसापूर, संदीप सिंग आणि विपन जाखर यांचा समावेश होता. हे चौघे कॅनडास्थित गुंड अर्श डल्ला आणि ऑस्ट्रेलियातील गुर्जंता जंता यांच्या संपर्कात होते. चौकशीदरम्यान त्याने दिल्ली आणि मोगासोबतच मोहाली हेही दहशतवाद्यांचे लक्ष्य असल्याचे उघड केले. तपासादरम्यान हल्ल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यापूर्वी 14 ऑगस्ट रोजी पंजाब पोलिसांनी याला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचा पाठिंबा असलेले दहशतवादी मॉड्यूल घोषित केले होते. पंजाबच्या डीजीपींनीही यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली.

10 नेते आणि अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढवली पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय चंदीगड आणि मोहालीवर हल्ला करण्यासाठी प्रयत्नात आहे ISI BACKED TERRORIST TARGETS CHANDIGARH AND MOHALI. पंजाबमध्ये नेते आणि अधिकाऱ्यांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. त्यात माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा, माजी मंत्री गुरकीरत कोटली, विजय इंदर सिंगला आणि परमिंदर पिंकी यांची नावे प्रमुख आहेत. केंद्रीय गुप्तचर संस्थेने पंजाब पोलिसांना 10 जणांची यादी पाठवली होती. त्यानंतर या सर्वांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा Jammu & Kashmir कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.