ETV Bharat / bharat

तेलंगाणामध्ये १२ मेपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

author img

By

Published : May 11, 2021, 2:51 PM IST

Updated : May 11, 2021, 7:33 PM IST

कोरोना लसीकरणासाठी जागतिक निविदा मागविण्याचाही निर्णय तेलंगाणा मंत्रिमंडळाने घेतला आहे. तेलंगाणा मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.

लॉकडाऊन
लॉकडाऊन

हैदराबाद - तेलंगाणा सरकारने उद्यापासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. तेलंगाणामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तेलंगाणा मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत १० दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना लसीकरणासाठी जागतिक निविदा मागविण्याचाही निर्णय तेलंगाणा मंत्रिमंडळाने घेतला आहे.

जिल्हास्तरीय समिती आणि राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना-

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी तेलंगाणा मंत्रिमंडळाची २० मे रोजी बैठक होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मुख्य सचिव सोमेश कुमार यांना कोरोनावरील उपचारासाठी औषधे, ऑक्सिजन, रेमडेसिवीरसारखी औषधे सरकारीसह खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रिमंडळाने जिल्हास्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचे अध्यक्ष मंत्री असणार आहेत.

राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांनी औषध उत्पादकांशी संवाद साधला आहे. आयटी आणि उद्योग मंत्री के. टी. रामाराव यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती औषधांसह इंजेक्शनचा पुरवठा, खरेदीबाबत निर्णय घेणार आहे.

हेही वाचा-काश्मीर : अनंतनागमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

तेलंगाणा मंत्रिमडंळाची बैठक सुरू -

सरकारने सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत चार तासासाठी खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. यावेळी नागरिकांना जीवनावश्यकसह इतर खरेदी करता येणार आहे.

यांना लॉकडाऊनमध्ये असणार मुभा-

  • शेतीशी संबंधित कामे, तसेच कृषी उत्पादने यांचे कारखाने, शेतमालाची वाहतूक, खत आणि बियाणे दुकाने
  • औषधी कारखाने, वैद्यकीय उपकरणे, औषध वितरक, मेडिकल शॉप. सर्व वैद्यकीय आणि आरोग्य सेवा
  • सरकारी व खासगी रुग्णालयांमधील कर्मचारी. त्यांना विशेष पास देऊन वाहनांमधून प्रवास करण्याची मुभा
  • पाणी पुरवठा, ग्रामीण तसेच शहरामधील स्वच्छता कर्मचारी
  • वीज निर्मिती, वितरण आणि संबंधित सेवा
  • राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला परवानगी
  • राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल आणि डिझेल पंप राहणार खुले
  • गोदामे आणि शीतकरणगृहे
  • प्रिंट आणि इलेट्रॉनिक मीडिया
  • ईसीजी वर्क
  • सरकारी कार्यालये ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती खुली राहणार
  • मागील लॉकडाऊनप्रमाणे बँकासह एटीएम सेवा राहणार सुरू
  • पूर्वपरवानगीने ४० सदस्यांच्या उपस्थितीत विवाह सभारंभ
  • अंतिमसंस्कारांना जास्तीत जास्त २० जणांना परवानगी
  • तेलंगाणा सीमेवर सुरू होणार चेक पोस्ट
  • सार्वजनिक वाहतूक आरटीसी आणि मेट्रो सकाळी सहा ते सकाळी १० वाजेपर्यंत राहणार सुरू
  • सार्वजनिक वितरण व्यवस्था (रेशन शॉप) सकाळी सहा ते सकाळी १० वाजेपर्यंत राहणार सुरू
  • एलपीजी वितरणही राहणार सुरू

या लॉकडाऊनमध्ये सिनेमा हॉल, स्विमिंग हॉल, क्लब्स, जिम्स, अॅम्युझमेंट पार्क व क्रीडांगण बंद राहणार आहेत.

दरम्यान, मंत्रिमंडळाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. यापूर्वी तेलंगाणामध्ये नाईट कर्फ्यू रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत लागू करण्यात आला होता.

हेही वाचा-'टॉमी'ला 'कुत्रा' म्हणणं पडलं महागात; दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी.. व्हिडिओ व्हायरल

Last Updated : May 11, 2021, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.