ETV Bharat / bharat

तामिळसाई सौंदराराजन  पुद्दुचेरीचे नव्या नायब राज्यपाल

पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांची नायब राज्यपाल पदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर आज तामिळसाई सौंदराराजन यांनी गुरुवारी पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून औपचारिकपणे कार्यभार स्वीकारला.

तामिळसाई सौंदराराजन
तामिळसाई सौंदराराजन
author img

By

Published : Feb 18, 2021, 3:45 PM IST

पुद्दुचेरी - येत्या काही महिन्यात पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांची नायब राज्यपाल पदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर आज तामिळसाई सौंदराराजन यांनी गुरुवारी पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून औपचारिकपणे कार्यभार स्वीकारला. मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी आज राज निवासात तमिळसाई यांना पदाची शपथ दिली. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी कार्यक्रमास उपस्थित होते.

तामिळसाई केंद्रशासित प्रदेशातील 26 व्य नायब राज्यपाल आणि पाचव्या महिला नायब राज्यपाल आहेत. पुदुचेरीच्या इतिहासात प्रथमच, तामिळ भाषिक व्यक्तीला नायब राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

पुद्दुचेरीत काँग्रेसचे सरकार अल्पमतात -

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये चार आमदारांनी दिलेला राजीनामा आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही. नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले आहे. 33 सदस्य असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत आता काँग्रेसकडे केवळ 14 आमदार राहिले आहेत. अल्पमतात आलेलं काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी राहुल गांधी कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक -

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसची सहकारी असलेल्या डीएमकेने 4 जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.