ETV Bharat / bharat

सोनिया गांधी तेलंगणातून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवतील? जाणून घ्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 10:37 PM IST

Sonia Gandhi Telangana : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, अशी राज्यातील काँग्रेस नेत्यांना वाटतं. मात्र सोनिया गांधी रायबरेली सारखी सुरक्षित जागा सोडून तेलंगणातून निवडणूक का लढवतील? जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

Sonia Gandhi Telangana
Sonia Gandhi Telangana

हैदराबाद Sonia Gandhi Telangana : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सोनिया गांधी यांना तेलंगणातून निवडणुकीला उभं करण्याच्या प्रयत्नात आहे. राज्य काँग्रेसनं याबाबतचा प्रस्ताव तयार करून नेतृत्वाकडे पाठवला असून त्यावर चर्चा सुरू आहे.

सोनिया गांधी तेलंगणातून निवडणूक का लढवतील : आता प्रश्न निर्माण होतो की, उत्तर प्रदेशातील रायबरेली सारखी पारंपारिक जागा सोडून सोनिया गांधी तेलंगणातून निवडणूक का लढवतील? यामागे अनेक कारणं आहेत. तेलंगणात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं. 2013 मध्ये अस्तित्वात आल्यापासून तेलंगणात पहिल्यांदाच सत्तापरिवर्तन झालं आहे. या निवडणुकीतही केवळ सोनिया गांधींमुळेच तेलंगणा वेगळं राज्य झाल्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं प्रदेश काँग्रेसला वाटतं. यामुळे सोनिया गांधी यांनी थेट तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढविल्यास पक्षाला अधिक उत्साह आणि गती मिळेल, असा विश्वास राज्याच्या नेत्यांनी व्यक्त केलाय.

कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील : तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे नेते सोनिया गांधींना नलगोंडा किंवा खम्मम मतदारसंघातील कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्यास सांगत आहेत. काँग्रेसनं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यांतील दोन जागा वगळता इतर सर्व विधानसभा जागांवर विजय मिळवलाय. तसेच सोनिया तेलंगणात आल्यास दक्षिण भारतातील राज्यांमध्ये काँग्रेससाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल, अशी आशा नेत्यांना आहे.

रायबरेलीतून प्रियंका गांधी लढणार का : दुसरीकडे, काँग्रेस आणि तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष डीएमके हे 'इंडिया' आघाडीचे भागीदार आहेत. राजीव गांधी यांची हत्या झालेल्या श्रीपेरुम्बुदूरमधून सोनियांनी निवडणूक लढवल्यास तामिळनाडूमध्ये काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण तयार होईल, असं राज्यातील नेत्यांना वाटतं. तर रायबरेलीतून सोनिया गांधींच्या जागी प्रियंका गांधी निवडणूक लढल्या, तर उत्तर प्रदेशात पक्षासाठी सकारात्मक वातावरण तयार होईल, असा विश्वास नेत्यांना आहे.

राज्यात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण : प्रदेश काँग्रेस कमिटीनं तेलंगणातील सर्व 17 जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे. खम्मम किंवा नलगोंडा या जागेवरून सोनियांनी निवडणूक लढवली तर दुसऱ्या जागेवर कोण उमेदवार असेल याची चर्चा नेत्यांमध्ये सुरू आहे. शिवाय पक्ष मलकाजीगिरी, पेड्डापल्ली, हैदराबाद, वारंगल आणि चेवेल्ला या जागांसाठी तगडे उमेदवार शोधत आहे. राज्यात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण दिसत असल्यानं दुसऱ्या पक्षातील ज्येष्ठ नेते देखील काँग्रेसमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहेत.

हे वाचलंत का :

  1. राजकारण नको रे बाबा! अंबाती रायुडूनं आठवडाभरातच सोडला 'हा' पक्ष
  2. 'लक्षद्वीपला जाऊन स्वतःचे फोटो काढतात, हे महापुरुष मणिपूरला का जात नाहीत?' खरगेंचा मोदींना खोचक सवाल
  3. लोकसभा निवडणुकीत 'इंडिया आघाडी' 400 जागांवर भाजपाला टक्कर देण्याच्या तयारीत, वाचा खास रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.