पाटना - गलवान खोऱ्यात 2020 मध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज बिहारची राजधानी पाटणा येथे पोहोचले आहेत. (KCR Meets Nitish Kumar) केसीआर पाटणा येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. काही वेळात दोन्ही नेत्यांमध्ये बैठकही झाली. आजच्या राजकीय परिस्थितीत या दोन नेत्यांच्या बैठकीला मोठे महत्व आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राव अन् मुख्यमंत्री नितीश यांच्यात चर्चा - मुख्यमंत्री नितीश यांच्या भेटीदरम्यान राव देशातील वर्तमान आणि भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर चर्चा करण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
राव शहीद जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये देणार - राव शहीद जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये आणि मृत स्थलांतरित कामगारांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करतील. राव यांनी 2020 मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या 19 जवानांच्या कुटुंबीयांना पाठिंबा जाहीर केला होता. तेलंगणा सरकारने यापूर्वी चकमकीत शहीद झालेल्या दक्षिणेकडील राज्यातील कर्नल संतोष बाबू यांना मदत केली होती.
तेलंगणातील प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी - आपण एकट्याने तेलंगणा वेगळे राज्य केले, तुम्ही एकटे आहात. या देशात लोक तुमच्याबद्दल काही ना काही बोलत राहतात जे पूर्णपणे निरुपयोगी आहेत. तेलंगणातील माणूस तुम्हाला एकटे सोडणार नाही. कोण काय बोलत आहे याचा विचार करण्याची गरज नाही. तेलंगणाच्या विकासासाठी तुम्ही सर्व प्रकारचे काम करता. तेलंगणा हे दक्षिण भारतातील एकमेव राज्य आहे ज्याने मिशन भागीरथी योजनेअंतर्गत तेलंगणातील प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी पुरवले आहे. अशी स्तुतीसुमन नितीश कुमार यांनी केसीआर यांच्यावर उधळली आहेत.
नितीश यांनी केसीआर यांचे आभार मानले - आज गलवान खोरे आणि हैदराबादमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मदतीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना १० लाख रुपये आणि हैदराबादमध्ये शहीद झालेल्यांना ५ लाख रुपयांची मदत हैदराबाद सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात हैदराबादमधून 21 लाख लोकांना येथे आणण्यात आले. नितीश कुमार यांनी के चंद्रशेखर राव यांचे कौतुक केले आणि म्हणाले की, तुमच्यामुळेच तेलंगणा वेगळे राज्य झाले आणि तुम्ही हा संघर्ष केला, तुम्ही 2001 पासून व्यस्त आहात. आंध्र प्रदेशचे दोन भाग करून विकास करण्याचे बोलले आणि त्यात तुम्ही यशस्वी झालात, असे नितीशकुमार म्हणाले.
हेही वाचा - देशभरातील भाजपच्या ऑपरेशन लोटसवरील 6300 कोटींच्या खर्चाची सीबीआय चौकशी व्हावी, आपची मागणी