ETV Bharat / bharat

Telangana Assembly Elections : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पडले, पाहा व्हिडिओ

Telangana Assembly Elections : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरावर आहे. निजामाबादमध्ये भारत राष्ट्र समितीचे नेते तसंच मुख्यमंत्री केसीआर यांचे पुत्र केटीआर यांनी आज प्रचार केला. जीवन रेड्डी यांचा अर्ज भरण्यासाठीच्या रॅलीत ते सहभागी झाले होते. मात्र यावेळी काय घडलं ते वाचा आणि पाहा.

Telangana Assembly Elections
Telangana Assembly Elections
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 6:28 PM IST

Updated : Nov 9, 2023, 8:11 PM IST

केटीआर प्रचार वाहनातून खाली पडताना

निजामाबाद Telangana Assembly Elections : तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र तसंच राज्याचे मंत्री केटीआर हे देखील पक्षाच्या प्रचारात व्यग्र आहेत. मात्र निजामाबाद जिल्ह्यातील आरमोर येथे आयोजित बीआरएस नामांकन रॅलीत ते प्रचार वाहनातून खाली पडले. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

मंत्री केटीआर खाली कोसळले : तेलंगणाचे मंत्री केटीआर गुरुवारी निजामाबाद जिल्ह्यातील आरमर येथे निवडणूक रॅलीदरम्यान वाहनातून पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे पुत्र केटी रामाराव इतर कार्यकर्त्यांसह प्रचार वाहनावर उभे असल्याचं दिसत आहे. यावेळी चालकानं अचानक ब्रेक लावल्यानं ते कार्यकर्त्यांसह खाली कोसळले.

केटीआर राव किरकोळ जखमी : या घटनेत मंत्री केटीआर तसंच सुरेश रेड्डी किरकोळ जखमी झाले आहेत. आरमोर शहरातील जुना अलूर रोडवर ही घटना घडली. मात्र, नंतर केटीआर आणि नेते अर्ज भरण्यासाठी गेले. नामांकनानंतर केटीआर जखमी खासदार सुरेश रेड्डींसोबत हैदराबादला रवाना झाले. जिथे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले.

अचानक ब्रेक मारल्यानं घडली घटना : सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये केटीआर हातानं तोल सांभाळताना दिसत आहेत. तर, त्याच्या आजूबाजूचे काही लोक वाहनातून खाली पडताना दिसत आहेत. मंत्री केटीआर पक्षाचे उमेदवार जीवन रेड्डी यांच्या नामांकन प्रचाराला गेले होते. अपघात झाला तेव्हा केटीआरां यांची प्रचार व्हॅन अरुंद गल्लीत होती. केटीआर वाहनाच्या छतावरून लोकांना अभिवादन करत होते. त्यावेळी चालकानं अचानक ब्रेक मारल्यानं गाडीवरील बॅरिकेड्स तुटलं, त्यामुळं गाडीवर उभे असलेले नेते वाहनातून खाली पडले.

30 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका : तेलंगणात येत्या 30 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहे. त्याआधी सत्ताधारी पक्ष पूर्ण जोमानं प्रचारात व्यग्र आहे. भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गजवेल तसंच कामरेड्डी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

हेही वाचा -

  1. KCR in Sambhajinagar :...तर मी महाराष्ट्रात परत येणार नाही; केसीआर यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला, केंद्र सरकारही टार्गेटवर
  2. KCR Criticized PM Modi : खासगीकरणावरुन केसीआर यांचा मोदी सरकारवर घणाघात; म्हणाले, 2024 मध्ये आम्हीच सत्तेत
  3. KCR Meets Nitish Kumar: बिहारमधील क्रांतीमुळे देशात शांतता, नितीश कुमारांच्या भेटीनंतर केसीआर यांची प्रतिक्रिया

Last Updated : Nov 9, 2023, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.