ETV Bharat / bharat

तेलंगाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; 'बीआरएस'च्या कारला लागला ब्रेक, भाजपाचाही वाढला आकडा - तेलंगाणा भाजपा

Telangana Assembly Election Results २०२३ : भारतातील चार महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी (3 डिसेंबर) जाहीर झाले आहेत. यातील तीन राज्यात भाजपानं बहुमत मिळवलं आहे. तर एका राज्यात काँग्रेसला बहुमत मिळवण्यात यश आलंय.

telangana result 2023
तेलंगाणा निकाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 8:11 PM IST

Updated : Dec 3, 2023, 9:01 PM IST

जल्लोष करताना काँग्रेस कार्यकर्ते

हैदराबाद Telangana Assembly Election Results २०२३ : तेलंगाणाच्या 119 विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान झालं होतं. या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाले आहेत. तेलंगाणात 'बीआरएस'ला मागं टाकत काँग्रेसनं बहुमत मिळवलं (Congress Wins Telangana) आहे. त्यामुळं के. चंद्रशेखर राव यांना हा मोठा धक्का आहे. याच केसीआर (KCR) यांनी 'टीआरएस' हे पक्षाचं नाव बदलत 'बीआरएस' (BRS) अर्थात तेलंगाणा राष्ट्र समिती हे नाव भारत राष्ट्र समिती ठेवण्यात आलं. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती आणि यात त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

विधानसभा निकाल 2023 : रविवारी जाहीर झालेल्या निकालानुसार, तेलंगाणात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. याठिकाणी काँग्रेसला 64 जागा मिळाल्या आहेत. तेलंगाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली होती. यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसून आले. तर दुसरीकडं तेलंगाणा राज्य स्थापन झाल्यापासून सत्तेत असलेल्या 'टीआरएस' अर्थात 'बीआरएस'ला या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत 'बीआएस'ला फक्त 36 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे तेलंगाणातून 'बीआएस'चं सरकार गेलं आहे. भाजपानं आपली केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वच फैज तेलंगाणाच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारासाठी तेलंगाणात ठाण मांडून होते. निकालाच्या अखेरीस भाजपाला तेलंगाणात 8 जागा मिळाल्या आहेत. तर औवेसी यांच्या 'AIMIM' ला फक्त सातचा आकडा गाठता आला.

केसीआर यांच्यावर रेवंत रेड्डी भारी : तेलंगणामध्ये (Telangana Election result 2023) पहिल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) बहुमत मिळवलं. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणूक झाली. तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात BRS ची सत्ता होती. मात्र, काँग्रेसने मुसंडी मारत यंदा बहुमत मिळवलं. तेलंगाणात काँग्रेसच जिंकेल असं एक्झिट पोलमध्ये आधीपासूनच सांगितलं होतं. तेलंगाणामध्ये रेवंत रेड्डी (Revanth Reddy) हे काँघ्रेससाठी गेमचेंजर ठरले आहेत. रेवंत रेड्डी हे तेलंगाणा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आक्रमक कार्यशैली आणि संघटनेत दबदबा असं रेवंत रेड्डी यांचं नेतृत्व आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि भारत राष्ट्र समितीचा गड (Bharat Rashtra Samithi) असलेल्या कामारेड्डी (Kamareddy) या भागातून स्वत: रेवंत रेड्डी यांनी निवडणूक लढली.

Telangana Assembly election results 2023
तेलंगाणातील 2023 आणि 2018 चे निकाल

मागील विधानसभा निकालांची आकडेवारी : 2014 मध्ये तेव्हाच्या 'टीआरएस'ला 63 जागा मिळाल्या होत्या तर 2018 मध्ये 88 जागांवर विजय प्राप्त झाला होता. आता 2023 मध्ये 'बीआरएस'ला 39 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसची आकडेवारी पाहिली तर 2014 ला काँग्रेसला 21 तर 2018 मध्ये 19 जागांवर विजय प्राप्त झाला होता. तर आता 2023 मध्ये तेलंगाणात 64 जागा जिंकत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता 2014 मध्ये पाच तर 2018 च्या विधानसभा निकालात केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. तर आता 2023 च्या निकालात भाजपाचा आकडा वाढला असून, 8 जागांवर विजय प्राप्त केला आहे. तर MIM ला 2014 मध्ये सात जागा, 2018 मध्येही सात जागा आणि आता 2023 मध्येही सात जागाच जिंकता आल्या आहेत.

सहा 'बीआरएस' मंत्र्यांचा पराभव : तेलंगाणा निकालात 'बीआरएस'ला मोठा धक्का बसला आहे. मंत्री ए इंद्रकरण रेड्डी, ई दयाकर राव, कोप्पुला ईश्वर, श्रीनिवास गौड, सिंगिरेड्डी निरंजन रेड्डी आणि पुव्वाडा अजय कुमार या सहा 'बीआरएस'च्या मंत्र्यांना या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला आहे. तेलंगाणा राज्याच्या स्थापनेपासून तब्बल नऊ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर काँग्रेसने भारत राष्ट्र समिती (BRS) ला पराभूत केलं आहे. केसीआर यांच्या सरकारमधील सहा कॅबिनेट मंत्र्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

सोमवारी शपथविधी सोहळा : तेलंगाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसच्या विजयी आमदारांची बैठक घेऊन त्यांनी दिलेल्या पसंतीच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप मुख्यमंत्री कोण होणार यावरील निर्णय जाहीर झालेला नाही. तर हैदराबादमधील एलबी स्टेडियवर सोमवारी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा -

  1. भाजपाच्या विजयाचं श्रेय महिलाशक्तीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्टोक्ती, युवक शेतकऱ्यांसह गरिबांचेही मानले आभार
  2. तेलंगणात झळकले महाराष्ट्राचे माणिक'राव'; काँग्रेस विजयात 'ठाकरें'चं योगदान
  3. मोठी बातमी! रेवंत रेड्डींना भेटणं तेलंगाणा पोलीस महासंचालकांना पडलं महागात; EC कडून निलंबनाची कारवाई

Last Updated : Dec 3, 2023, 9:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.