ETV Bharat / bharat

तेलंगाणा विधानसभा निवडणूक 2023 ; प्रचाराचा आज शेवटचा दिवस, मतदारांना भेटवस्तू, पैसे, तर कुठं चिकन वाटप

Telangana Assembly Election 2023 : तेलंगाणा विधानसभा निवडणूक 2023 च्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समिती, भाजपा आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे यश मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Telangana Assembly Election 2023
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 3:48 PM IST

हैदराबाद Telangana Assembly Election 2023 : तेलंगाणा विधानसभा निवडणूक 2023 चा प्रचार संपण्याला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे भारत राष्ट्र समिती, काँग्रेस आणि भाजपानं निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. तेलंगाणात 30 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळं आता प्रचाराला फक्त आजचा दिवस शिल्लक उरला आहे.निवडणुकीत होणाऱ्या पैशाच्या उधळपट्टीला वेग आल्याची चर्चा आहे.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी खैरात? : तेलंगाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीत पैसे वाटण्याच्या कामाला वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अगोदर मतदारांना पैसे वाटण्याचं काम काही परिसारत सुरू होतं. मात्र आता राज्यभर पैसे वाटपाचं लोण पसरल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे. निजामाबाद जिल्ह्यातील मतदार संघात एका पक्षानं प्रति घर 10 हजार रुपये वाटप सुरू केलं. नंतर ते प्रत्येक मतासाठी तीन हजार रुपये देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिन्ही पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा या जिल्ह्यात आहे. त्यामुळे एक पक्ष एका मतासाठी 50 हजार रुपये देत असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त खम्मम जिल्ह्यातील मतदार संघातील मुख्य पक्षाच्या उमेदवारानं 90 टक्के मतदारांना पैसे दिल्याचं विश्वसनिय सूत्रांनी सांगितलं आहे. दुसऱ्या उमेदवारानं तीन हजार रुपये प्रति मत या दरानं पैसे वाटप सुरू केल्याचंही या सूत्रांनी सांगितलं आहे.

काही ठिकाणी पैसे तर काही ठिकाणी चिकन वाटप : काही मतदार संघात दुरंगी लढत होणार आहे. या मतदार संघात दोन उमेदवारांनी किमान 80 ते 90 टक्के मतदारांना लक्ष्य करत भेटवस्तू दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यातील एका मतदार संघात निवडणूक लढवणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या मतदार संघात प्रत्येक मतासाठी तीन हजार रुपये देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या मतदार संघात दुसऱ्या उमेदवारानं प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची व्यवस्था केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. निजामाबाद जिल्ह्यातील एका प्रमुख पक्षाशी संबंधित उमेदवाराच्या घरी 5 हजार रुपये वाटप करण्यात येणार असल्याचं नेत्यानं स्पष्ट केलं होतं. या उमेदवारानं मतदारांना कुकर आणि साड्यांचं वाटप केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मेडक जिल्ह्यातील मतदार संघात एका पक्षाच्या प्रमुख नेत्यानं मंगळवारी घरोघरी एक किलो चिकन वाटप करण्याचे आदेश दिल्यानं मोठी चर्चा रंगत आहे.

निवडणुकीत होऊ दे खर्च : तेलंगाणा विधानसभा निवडणूक चुरशीची होत असल्यानं उमेदवार जोमात खर्च करत आहेत. निजामाबाद जिल्ह्यातील मतदार संघात एका पक्षाच्या उमेदवारानं 1 हजार, 1 हजार 500 आणि 2 हजार रुपये देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. जगत्याला आणि पेद्दपल्ली जिल्ह्यातील मतदार संघात एका प्रमुख उमेदवारानं 2 लाख मतदारांना लक्ष्य केलं आहे. या मतदारांना 3 हजार रुपये दरानं पैसे वाटप केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका उमेदवारानं 1 हजार 500 ते 1 हजार रुपये दीड लाख मतदारांना वाटण्याची व्यवस्था केल्याचं सांगितलं जात आहे. पेडपल्ली जिल्ह्यातील मतदार संघात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात 5 हजार रुपये देण्याची सोय करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाकीट आणि घड्याळांमध्ये नोटा : तेलंगाणा विधानसभा निडणुकीसाठी सध्या घोडेबाजार जोमात सुरू आहे. उमेदवारांना मतांसाठी नोटांचं आमिष दाखवलं जात आहे. पैसे वाटपातही काही उमेदवार नवनवीन कलांचा अवलंब करत आहेत. एका उमेदवारानं पर्सचं वाटप केलं. 500 रुपयांच्या 4 नोटांचे व्हिडिओ पुढं आले आहेत. एका उमेदवारानं हैदराबादच्या आऊटर रिंग रोडला लागून असलेल्या मतदार संघात घड्याळ्याचं वाटप केलं. यात 500 रुपयांच्या सहा नोटा असल्याचे व्हिडिओ पुढं आले आहेत.

हेही वाचा :

  1. Telangana Assembly Election : तेलंगाणा विधानसभा निवडणूक, मुख्यमंत्री राव यांनी बीआरएसच्या सर्व 119 उमेदवारांची केली घोषणा
  2. तेलंगाणा विधानसभा निवडणूक 2023: निवडणूक तेलंगाणाची, भावी आमदारांच्या 'जोर' बैठका पुणे-मुंबईत!
  3. BRS Win Gram Panchayat : तेलंगाणा निवडणुकीपूर्वीच 'बीआरएस'नं महाराष्ट्रात उधळला गुलाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.