ETV Bharat / bharat

'जनतेने आम्हाला कौल दिला, मात्र, निवडणूक आयोगानं एनडीएला जिंकवलं'

तेजस्वी यादव यांनी निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला. जनतेने महागठबंधनला विजयी केले. मात्र, निवडणूक आयोगाने एनडीएला विजयी घोषित केले, असा आरोप त्यांनी केला.

तेजस्वी यादव
तेजस्वी यादव
author img

By

Published : Nov 12, 2020, 8:37 PM IST

पाटणा - बिहार विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी प्रथमच नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. त्यांनी महागठबंधनला मतदान केलेल्या मतदारांचे जाहीरपणे आभार मानले. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला. जनतेने महागठबंधनला विजयी केले. मात्र, निवडणूक आयोगाने एनडीएला विजयी घोषित केले, असा आरोप त्यांनी केला.

'मी नतमस्तक होऊन बिहारी जनतेचे आभार मानतो. जनतेने आपला निर्णय दिला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने एनडीएला विजयी केले. जनता आमच्याबरोबर आहे. महागठबंधन पराभूत झाली नाही. मात्र, षडयंत्र रचून आम्हाला पराभूत करण्यात आले. पोस्टाने पाठविण्यात आलेल्या मतांची मोजणी करताना गोंधळ झाला. २०१५ सालीही जनादेशाचा अपमान करण्यात आला. त्यावेळीही जनता आरजेडीच्या बरोबर होती. मात्र, चोर दरवाजाने एनडीएने सत्ता मिळवली, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून अटीतटीच्या लढतीत एनडीएला बहुमत मिळाले. एनडीएने १२५ जागा जिंकल्या तर महागठबंधनने ११० जागा जिंकल्या. फक्त १२ जागांवरून महागठबंधन सत्तेपासून दूर राहिली. एनडीएमध्ये जेडीयूला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या. त्यामुळे नितीश कुमार यांची क्रेझ कमी झाल्याचे निकालातून स्पष्ट दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.