ETV Bharat / bharat

लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेसाठी 'आझादी पत्र' मोहिम

author img

By

Published : Feb 12, 2021, 8:46 AM IST

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांने मोहिम सुरू केली आहे.

आझादी पत्र' मोहिम
आझादी पत्र' मोहिम

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची तुरुंगातून सुटका करण्यात यावी यासाठी तेज प्रताप यादव यांने मोहिम सुरू केली आहे. लालूंच्या सुटकेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ५० हजार पत्रे पाठविण्यात आली आहेत. मानवतेच्या भावनेतून त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी या पत्रांद्वारे करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींकडे पाठवणार पोस्ट कार्ड

या पत्रांना आमदार आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी 'आझादी पत्र' असे म्हटले आहे. जोपर्यंत वडीलांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे अभियान सुरूच राहिल, असे त्यांनी म्हटले आहे. लालू प्रसाद यादव यांच्या समर्थकांची पत्रे आम्ही गोळा करत आहोत. राष्ट्रपतींना मला भेटण्याची परवानगी द्यावी, असेही तेजप्रताप यांनी म्हटले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेसाठी पत्र लिहावे, आम्ही ते राष्ट्रपतींपर्यंत पोहचवू, असे आवाहन तेजप्रताप यांनी केले आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे लालू रुग्णालयात -

किडनी आणि हृदयाच्या समस्याने ग्रस्त असलेल्या लालू प्रसाद यादव यांना झारखंडमधील रिम्स रुग्णालयातून पुढील उपचारासाठी दिल्लीतल एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चारा घोटाळा प्रकरणी त्यांना तुरुंगवास झाला असून ते शिक्षा भोगत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लालू प्रसाद यांची किडनी २५ टक्के काम करत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मानवतेच्या भावनेतून त्यांची सुटका व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.