ETV Bharat / bharat

Cyclone Tauktae LIVE Updates : तौत्के चक्रीवादळाचा परिणाम जाणवायला सुरुवात; मुंबईत पावसाच्या सरी - महाराष्ट्र तौक्ते

Tauktae Cyclone LIVE Updates
LIVE : तौक्ते चक्रीवादळाचे लाईव्ह अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
author img

By

Published : May 16, 2021, 6:32 AM IST

Updated : May 17, 2021, 7:58 AM IST

06:57 May 17

तौक्ते चक्रीवादळ; वांद्रे - वरळी सी लिंकवर मुसळधार पाऊस

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौत्के चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील काही भागात वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. वांद्रे-वरळी सी लिंकवरही मुसळधार पाऊस सुरू आहे. वरळी सी लिंकवरून हे ताजे दृष्य.

02:40 May 17

तौत्के चक्रीवादळाचा परिणाम जाणवायला सुरुवात; मुंबईत पावसाच्या सरी

मुंबई - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौत्के चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शनिवारी रात्री व रविवारी काही भागात वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात वादळाची तीव्रता वाढल्याने येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे येथे वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज झाली असून आवश्यक यंत्रणा तैनात केली आहे.

22:34 May 16

तौक्ते चक्रीवादळ येत्या २४ तासात आणखी तीव्र होणार

मुंबई - तौक्ते चक्रीवादळ येत्या २४ तासांत आणखी तीव्र होणार आहे. हे वादळ उत्तर, वायव्ये दिशेकडे मार्गक्रमण करत १७ मे रोजी संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार आहे. पोरबंदर व महुआ येथे १८ मे रोडी पहाटेच्या सुमारास पोहोचेल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

20:36 May 16

गोव्याला चक्रीवादळाचा मोठा फटका, दोघांचा मृत्यू ; २०० घरांचे नुकसान

गोव्याला चक्रीवादळाचा मोठा फटका

पणजी (गोवा) - गोव्यात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. ५०० हून अधिक झाडे कोसळली आहेत. सुमारे १०० घरांचे मोठे आणि १०० घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. पणजीत १०८ मिली पावसाची नोंद झाली आहे. दुपारी चारनंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी वाऱ्याचा वेग कायम आहे. हे वादळ पणजीपासून अवघ्या १००.६ किमी अंतरावरून गेले आहे. 

20:28 May 16

सिंधुदुर्गात तौक्तेचा कहर.. १४४ कुटुंबांचे स्थलांतर, ४४७ घरांची पडझड

सिंधुदुर्गात किनारपट्टीवरच्या एकूण 144 कुटुंबाचे स्थलांतर

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीवरच्या एकूण 144 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. तर आहे. 447 घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जोरदार पाऊस अजूनही सुरु आहे. तसेच जिल्ह्यात सुमारे 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. मालवण तालुक्यातील आचरा जामडूल, गाउडवाडी भागात उधाणाचे पाणी अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित झाला असून तो सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत

19:37 May 16

रायगड जिल्हा प्रशासन सतर्क, 2,254 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

रायगड - तौक्ते चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात पहाटे दाखल होणार असल्याची शक्यता आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणारे तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या 2,254 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सुस्थळी हलविले आहे. रात्रीत अजून काही हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. वादळाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवारण कक्षात वॉर रूम तयार करून यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. 

19:05 May 16

गोव्यात वादळाचे दोन बळी, ५०० झाडं उन्मळून पडली

पणजी - गोवा राज्यात तौक्ते वादळामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. या वादळाच्या तडाख्यात ५०० झाडं उन्मळून पडली. सुमारे १०० मोठ्या घरांचे आणि १०० छोट्या घरांचे नुकसान झाले. रस्ते बंद झाले आहेत. वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला आहे.

19:04 May 16

तौक्ते चक्रीवादळ १८ मे रोजी गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाने सध्या कर्नाटकच्या किनारी भागाला झोडपून काढले असून सहा जिल्ह्यांत ७३ गावांना याचा फटका बसला आहे. आज सायंकाळी हे वादळ गोव्यातून रत्नागिरीत दाखल झाले. दरम्यान, हवामान विभागाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, तौक्ते चक्रीवादळ १८ मे रोजी गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. .

19:04 May 16

तौक्ते चक्रीवादळ गोव्यातून रत्नागिरीत दाखल.. मुंबईत प्रशासन सतर्क

मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे  मुंबईत निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे. या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे लाईफगार्ड्सह बचाव पथके मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर तैनात करण्यात आली आहेत. चक्रीवादळामुळे उन्मळून पडण्याची शक्यता असणारी मोठी झाडे छाटण्यात आली आहेत. पोलिस प्रशासनही सज्ज आहे., अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

18:56 May 16

केरळमध्ये तौक्तेचा हाहाकार.. अनेक घरे गेली बाहून

तिरुअनंतपुरम - केरळच्या तिरुअनंतपुरम किनारपट्टी भागात असलेल्या वालियाथुरा गावात समुद्राच्या लाटांमुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांच्या बाजूच्या भिंती पडल्या आहेत, तर काही घरे वाहून गेली आहेत. अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. 

18:54 May 16

कोल्हापूरमध्ये जोरदार वारे.. झाडांच्या फांद्याचा विद्युत तारांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट, वीजपुरवठा खंडित

कोल्हापुरात शॉर्टसर्किटने झाडाला आग

कोल्हापूर - सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे झाडाच्या फांद्यांना विजेच्या तारांना स्पर्श. शॉर्ट सर्किटमुळे झाडाला किरकोळ आग लागली. यामुळे काही काळासाठी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. झाडाचा विजेच्या तारांना स्पर्श होतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही घटना कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील आहे. 

17:49 May 16

तोक्तेचा रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा.. ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे

रत्नागिरीतील वादळ स्थितीचा सायंकाळी पाच वाजता घेतलेला आढावा

रत्नागिरी - अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर आदळले असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे आता राजापूर तालुक्यातील अनेक गावातील घरांवरील पत्रे व कौले उडून गेली असून बारे ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहत आहेत. दुपारी २ नंतर रत्नागिरी आणि परिसरात वादळाचा प्रभाव वाढू लागल्याचे दिसून आले. मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहू लागला आहे.

17:29 May 16

रायगड जिल्ह्यात दुपारनंतर वातावरणात बदल.. वादळाचा अद्याप कोणताही परिणाम नाही

रायगडमधील दुपारी चार वाजताची वादळ परिस्थिती

रायगड - तौक्ते चक्रीवादळ हे रत्नागिरी जिल्ह्यात आले असून काही तासानंतर रायगडकडे सरकणार आहे. सद्य परिस्थितीत रायगडात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही प्रमाणात रिमझिम पाऊस पडत असून जोरदार वारे वाहत आहेत. समुद्रकिनारे हे खवळले असले तरी सद्यस्थितीत वादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसत नाही. वादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत.

17:28 May 16

अमरावतीत 'तोक्ते' वादळाचा परिणाम.. वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्या तुटल्या

अमरावती - रविवारी दुपारी अचानक झालेल्या वादळाचा फटका महावितरणला बसला असून यामध्ये महावितरण यंत्रणा विस्कळीत होऊन काही भागाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरण यंत्रणा लागलीच कामाला लागली असल्याने टप्प्या-टप्प्याने खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.

16:20 May 16

हिंगोली जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसास सुरुवात

हिंगोली - जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी तीनच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे हिंगोली शहरात तर पावसाचा एवढा वेग होता त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सध्या शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र पावसामुळे शेतीच्या कामांना ब्रेक लागणार आहे.

16:15 May 16

जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, चिंचेचे झाड अंगावर कोसळून दोन बहिणींचा मृत्यू

जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

जळगाव - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे हवामान बदलाचा प्रत्यय येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, आज (रविवारी) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. काल, शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर आज देखील सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी सूर्यदर्शन झाले.जळगाव शहरात दुपारी सूर्यदर्शन होऊन पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. अडीच वाजताच्या सुमारास वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. 15 ते 20 मिनिटे पाऊस पडला. वादळामुळे झाड कोसळून दोन बहिणींचा जागीच मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथील घटना. दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यानंतर वादळामुळे चिंचेचे जुने झाड कोसळले.

15:37 May 16

तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 17 मे रोजीचा लसीकरण कार्यक्रम रद्द

दुपारी ३.४० वाजता रत्नागिरीमधील वादळाची स्थिती

मुंबई - तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 17 मे रोजीचा लसीकरण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मंगळवार ते गुरुवार लसीकरण सुरू राहणार आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार कोव्हीशिल्डचा दुसरा डोस 12 ते 16 आठवड्याच्या कालावधीत दिला जाणार आहे. त्यामुळे हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. 1 मार्चपासून 45 व 60 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यांना दुसरा डोस दिला जाणार नाही.  18 ते 20 मे दरम्यान 60 वर्षावरील नागरिकांना कोव्हीशिल्डचा पहिला डोस दिला जाणार आहे

15:20 May 16

तौत्के चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात दाखल, किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस

दुपारी ३ .२० वाजता रायगडमधील स्थिती

रायगड - तौत्के चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहे. राजापूर तालुक्यातील किनारपट्टी भागापासून 80 ते 90 किलोमीटर आतमध्ये चक्रीवादळ दाखल झाले आहे. 

15:18 May 16

तौत्के चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत दाखल, रस्ते अपघातात एक जण ठार

सिंधुदुर्गमध्ये तौत्के चक्रीवादळाचे थैमान

सिंधुदुर्ग - तौत्के चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत दाखल झाले आहे. या वादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. यामुळे खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. या वादळाचा फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला. महामार्गावर असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक खासगी बस पलटी झाली. या अपघातात एका पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर जिल्ह्यात ४० घरे आणि ३ शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

14:46 May 16

तौत्के चक्रीवादळ : कर्नाटकात चार जणांचा मृत्यू, सहा जिल्ह्यातील ७३ गावांना फटका

तौत्के चक्रीवादळामुळे आतापर्यंत ४ जणांना जीव गमवावा लागला असून सहा जिल्ह्यांतील ७३ गावांना या वादळाचा फटका बसला आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

14:25 May 16

मुंबई मनपाची वादळावर नजर

मुंबई मनपाची वादळावर नजर

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर चक्रीवादळ हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकू लागला आहे. वादळ मुंबईपासून साधारण 400 किलोमीटर दूर आहे. मुंबईमध्ये सध्या वाऱ्याचा वेग ताशी तेवीस किलोमीटर इतका आहे हाच वाऱ्याचा वेग मध्यरात्रीच्या सुमारास ऐंशी किलोमीटर प्रति तास इतका होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पालिकेची डिझास्टर मॅनेजमेंट ची संपूर्ण टीम या वादळा वर लक्ष ठेवून आहे मुंबईच्या सहा चौपाट्यांवर बावीस सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. तर संपूर्ण मुंबई जवळपास पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमातून नजर ठेवली जाते. या संपूर्ण परिस्थितीचा डिझास्टर मॅनेजमेंटच्या कंट्रोल रूम मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी..

14:25 May 16

तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या उंबरठ्यावर, जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढला वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या उंबरठ्यावर आहे. राजापूर तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने आंबोलगड येथील 68 कुटुंबातील 254 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. मुसाकाझी येथील दोन कुटुंबातील लोकांचेही स्थलांतर केले आहे. तर आवळीचीवाडी येथील 7 कुटुंबातील 35 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. 

13:06 May 16

61 मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द..

'तौत्के' चक्रीवादळामुळे पश्चिम रेल्वेने महाराष्ट्र आणि गुजरातमधून जाणाऱ्या 61 मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आलेला आहेत.

13:05 May 16

वादळ सिंधुदुर्ग समुद्राच्या हद्दीत..

  • वादळ सिंधुदुर्ग समुद्र हद्दीत.
  • गोवा व सिंधुदुर्ग मध्ये मुसळधार पाऊस.
  • गोव्यात अनेकठिकानी झाडे पडून नुकसान.
  • वादळी वाऱ्यामुळे भीतीचे वातावरण.
  • वाऱ्यांचा वेग वाढला.

12:53 May 16

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा..

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेतला आहे. वादळापूर्वी २४४ मच्छिमार नौका समुद्रात गेल्या होत्या, यांपैकी १६२ शनिवार रात्रीपर्यंत परतल्या आहेत. बाकी नौकांना सुरक्षित परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. 

12:50 May 16

तामिळनाडू,केरळमध्ये पूरजन्य परिस्थिती..

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय जल आयोगाने याबाबत माहिती दिली. केरळमधील मनिमला नदी दुथडी भरुन वाहत आहे. धोक्याच्या पातळीपेक्षाही ०.६५ मीटर पुढे ही नदी वाहत आहे. तर तामिळनाडूमधील कोडियार नदीही धोक्याच्या पातळीपेक्षा ०.४३ मीटर पुढे वाहत आहे.

12:12 May 16

तौक्ती चक्रीवादळाचा परिणाम रायगड जिल्ह्यात जाणवू लागला

रायगड : तोक्ती चक्रीवादळ रायगडकडे सरकत आहे. रायगडला या वादळाचा फटका काही प्रमाणात बसण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने अंदाज बांधला असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. वादळ येण्यापूर्वी जिल्ह्यात पावसाळी वातावरण आणि वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. काल 15 मे रोजी सायंकाळी दक्षिण रायगडमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही भागात तुरळक पावसाचा शिडकावा झाला आहे. आज सकाळपासून वारा वाहत आहे.

12:11 May 16

भीमाशंकर परिसरात तौक्ते चक्रीवादळाचे संकट..

Tauktae Cyclone LIVE Updates
भीमाशंकर परिसरात तौक्ते चक्रीवादळाचे संकट..

कोरोनाच्या संकट काळात तौत्के चक्रीवादळाचे नवीन संकट उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या पश्चिमकडील भागात उभे रहाले असून आज पहाटेच्या सुमारास भीमाशंकर परिसरातील भोरगिरी,भिवेगाव व इतर १५ गावांमध्ये वादळी वा-यासह पावसाच्या सरी झाल्या यामध्ये भिवेगाव येथील अनेकांच्या घरावरील पत्रे व छत तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेवरील छतही उडाल्याची घटना घडली आहे.

12:09 May 16

अमित शाहांनी केली मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा..

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. तौक्ते चक्रीवादळ आणि त्यासाठीची तयारी याबाबत ही चर्चा पार पडली.

11:54 May 16

तौक्ते चक्रीवादळ किनारपट्टी भागापासून 100 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळ किनारपट्टी भागापासून 100 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग किनारपट्टी भागात वाढला आहे. जिल्ह्यात रिमझिम पाऊसही बरसत आहे.

11:53 May 16

गोव्यात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित..

पणजी : तौक्ते चक्रीवादळ गोव्यात येऊन धडकल्यामुळे कित्येक झाडे आणि विजेचे खांब खाली पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कित्येक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. आतापर्यंत या चक्रीवादळामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

11:41 May 16

गुजरात : गांधीनगरमध्ये एनडीआरएफची पथके तैनात

गुजरात : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे. डेप्युटी कमांडंट रणविजय कुमार यांनी सांगितले, की आज सायंकाळपर्यंत २४ पथके आपल्या निर्धारीत जागी पोहोचतील. यातील १३ पथके ही बाहेरुन मागवण्यात आली आहेत.

11:31 May 16

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दिले प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्याचे आदेश

तौक्ते चक्रीवादळ १८ तारखेच्या पहाटे गुजरातला पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी अधिकाऱ्यांना तातडीने भरुचला पोहोचून, प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.

11:27 May 16

आज दिवसभर किनारी भागात अतिवृष्टी..

आज दिवसभर किनारी भागात अतिवृष्टी सुरू राहील, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे प्रवास करत राहील असेही विभागाने स्पष्ट केले.

11:25 May 16

कर्नाटकच्या ६ जिल्ह्यांमधील ७३ गावांना फटका; चार लोकांचा मृत्यू..

गेल्या २४ तासांमध्ये अतिवृष्टीमुळे कर्नाटकातील चार लोकांचा मृत्यू झाला आहे. सहा जिल्ह्यांमधील ७३ गावांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. यामधील तीन जिल्हे किनारी भागातील आहेत, अशी माहिती कर्नाटकच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

10:46 May 16

'तौक्ते’ चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र हद्दीत दाखल, गोवा सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरू

सिंधुदुर्ग - 'तौक्ते’ चक्रीवादळ सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या समुद्र हद्दीत दाखल झाले. यावेळी जोरदार पावसाच्या सरी गोव्यात कोसळत होत्या. अद्यापही हा पाऊस थांबलेला नाही. हे चक्रीवादळ सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत आहे. सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

10:39 May 16

कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू..

कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू..

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातदेखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

10:38 May 16

रत्नागिरीमधील समुद्रकिनाऱ्याहून आढावा..

रत्नागिरीमधील समुद्रकिनाऱ्याहून आढावा..

10:06 May 16

मुख्यमंत्र्यांची अमित शाहांसोबत बैठक..

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची बैठक पार पडेल. राज्याने चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी काय तयारी केली आहे, याबाबत मुख्यमंत्री शाहांना माहिती देतील. सकाळी साडे अकरा वाजता ही बैठक पार पडणार आहे.

10:06 May 16

मुंबईत वातावरण ढगाळ..

मुंबईत वातावरण ढगाळ..

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ढगाळ वातावरण. पाहा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा..

09:30 May 16

९ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करतंय तौक्ते..

तौक्ते चक्रीवादळ हे सध्या ९ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करत आहे. गेल्या सहा तासांपासून याच वेगाने ते प्रवास करत असल्याचे सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या हे चक्रीवादळ कर्नाटकचा किनारा ओलांडून गोव्याच्या दिशेने येत आहे.

09:27 May 16

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट..

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. कोलाबामधील प्रांतीय निरीक्षण केंद्राने १५ आणि १६ तारखेसाठी हा इशारा दिला आहे. या भागामध्ये तीव्र ते अतीतीव्र वृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

09:18 May 16

तौक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्ग आणि गोव्यातील परिस्थिती..

सिंधुदुर्ग : तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या किनारपट्टीवर काय परिणाम होणार आहे, आणि त्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विवेक ताम्हणकर यांनी.

09:07 May 16

रेल्वेच्या काही गाड्या रद्द

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रेल्वेने काही गाड्या तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली.

08:39 May 16

चक्रीवादळाचा परिणाम वाहतुकीवर! वांद्रे वरळी सी-लिंक बंद होणार?

तोत्के चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर होत त्याचा प्रवास गुजरातच्या दिशेने सुरू आहे. पुढच्या काही तासांमध्ये हे चक्रीवादळ मुंबईच्या जवळून जाईल. त्याचा परिणाम मुंबईमध्ये दिसू लागला आहे. रात्रीपासूनच हलक्‍या स्वरूपाचा पाऊस मुंबईत बरसू लागलाय. तसंच पुढील काळामध्ये सोसाट्याचा वारा वाहन याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे वांद्रे वरळी सी लिंक दळणवळणासाठी बंद करण्याचा सूचना देण्यात आले आहेत. मात्र सर्व अधिकार हे वाहतूक नियंत्रण विभागाकडे देण्यात आलेले आहे. 

08:38 May 16

तौक्ते चक्रीवादळ : रत्नागिरीतील परिस्थितीचा आढावा..

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. दरम्यान आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, तसेच रिमझिम पाऊसही जिल्ह्यात सुरू आहे. हे चक्रीवादळ आज राजापूर आंबोळगड येथून सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करेल असा अंदाज आहे. सागवे साखरीनाटे आदी भागातून हे वादळ पूर्णगड वरुन सायंकाळी चारपर्यंत रत्नागिरी शहर परिसरात येईल. यानंतर जयगड आदी भागातून हे वादळ रात्री अकरा वाजेपर्यंत गुहागरपर्यंत व परवा पहाटे दापोली वरून ते पुढे जाईल असा अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. रत्नागिरीतील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...

08:37 May 16

तौक्ते चक्रीवादळ : मुंबईतील परिस्थितीचा आढावा

तौक्ते चक्रीवादळाच्या दृष्टीने मुंबईमध्ये काय उपाययोजना केल्या जात आहेत, तसेच किनारी भागात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी.

08:36 May 16

मुंबईत पावसाच्या सरी, 7 झाडे कोसळली

  • तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत शहर, पूर्व उपनगर आणि पाश्चिम उपनगरात पावसाच्या सरी.
  • शहर विभागात 2 तर पश्चिम उपनगरात 5 अशी एकूण 7 झाडे कोसळली

07:11 May 16

तौक्ते चक्रीवादळ आता 'अतीतीव्र'..

तौक्ते चक्रीवादळाने आता रौद्ररुप धारण केले असून, ते आता 'अतीतीव्र' (व्हेरी सीव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म) प्रकारात मोडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. हे चक्रीवादळ रात्री अडीचच्या सुमारास गोव्यापासून १५०, मुंबईपासून ४९०, तर गुजरातपासून ७३० किलोमीटर दूर असल्याचेही सांगण्यात आले.

06:36 May 16

मुंबईतील ५८० कोविड रुग्णांचे केले स्थलांतर..

मुंबई - अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वादळी वारे, जोरदार पावसाची शक्यात लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून दहिसर, बीकेसी, मुलुंड येथील कोविड आरोग्य केंद्रातील रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले. या तीन केंद्रांमध्ये मिळून ५८० कोविड बाधित रुग्ण उपचार घेत होते. रात्रीच्या सुमारास या सर्वांचे स्थलांतर करण्यात आले.

06:36 May 16

पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

पुणे -  शनिवारी रात्रीच्या सुमारास पुण्यात वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने 11 झाडांची पडझड झाली आहे. यादरम्यान, कोणतीही जिवीतहानी झाली नसून अग्निशमन दलातर्फे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

06:36 May 16

मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी

मुंबई - अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे शनिवारी मध्यरात्री ढगांच्या गडगडाटासह मुंबई महानगर प्रदेशातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. दिवा परिसरालाही पावसाचा फटका बसला. दरम्यान, रविवारीही शहर व उपनगरांत जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

06:19 May 16

तौक्ते चक्रीवादळाचे लाईव्ह अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई : तौक्ते चक्रीवादळ हे सध्या कर्नाटकच्या किनारपट्टीवर असून; गोव्यापासून ते १७०, तर मुंबईपासून ५२० किलोमीटर दूर आहे. इथून गुजरातकडे जाण्यासाठी त्याला तीन दिवस लागतील. १८ मेच्या पहाटे ते गुजरातच्या पोरबंदर आणि महुआ किनाऱ्यावरुन पुढे जाईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ हे किनारपट्टीपासून दूर समुद्रात असल्यामुळे ते राज्यात धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा किनारपट्टी भागात याचा प्रभाव दिसणार आहे. चक्रीवादळाचा परिणाम हा संपूर्ण कोकणामधील जिल्ह्यांमध्ये दिसून येणार आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचेपर्यंत तीन दिवस कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Last Updated : May 17, 2021, 7:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.