विल्लुपुरम (तामिळनाडू) : विषारी दारू पिल्यामुळे तामिळनाडूच्या विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांतील 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेतील मृतांचा आकडा वाढून 21 झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने मंगळवारी देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. विषारी दारू पिल्याचे हे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीरपणे घेतले असून या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आली आहे.
या नागरिकांनी पुद्दुचेरी येथील एक व्यक्तीकडून हे मिथेनॉल हे रसायन घेतले होते. त्याचा वापर बनावट दारू करण्यासाठी केला जात होता. मिथेनॉल हे रसायन रंगहीन आणि ज्वलनशील द्रव असून ते औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते. मिथेनॉलमध्ये अल्कोहोलचा वास असतो. - सी सिलेंद्र बाबू, पोलीस महासंचालक
मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा : विल्लुपुरम आणि चेंगपट्टू येथे विषारी दारू पिल्यामुळे 21 नागरिकांचा मृत्यू झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस महासंचालक सी सिलेंद्र बाबू यांनी हे प्रकरण सीआयडीच्या गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. बनावट दारू नव्हे तर मिथेनॉल पिल्यामुळे मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते आणि एआयएडीएमकेचे AIADMK प्रमुख के पलानीस्वामी यांनी याप्रकरणी सत्ताधारी द्रमुकवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी के पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा अशी मागीही केली. त्यामुळे विषारी दारू प्रकरणाने चागलेट राजकारण ढवळून निघाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिली रुग्णालयाला भेट : विल्लुपुरम जिल्ह्यात 13 ते 15 मे दरम्यान विषारी दारू पिल्याने 13 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर आणखी एकाचा मृत्यू झाला. चेंगलपट्टू जिल्ह्यात 15 मेपर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांची संख्या 21 झाली आहे. विल्लुपुरम जिल्ह्यातील मुंडियमबक्कम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी बाधित रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी सीआयडीकडे वर्ग करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे.
दूध आणि मधाच्या नद्याऐवजी मद्यांच्या नद्या : विरोधी पक्षनेते के पलानीस्वामी यांनी विषारी दारू पिल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तींची भेट घेतली. एक्कियारकुप्पम आणि पेरुणकरनई गावांमध्ये मिथेनॉलच्या सेवनामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला. नागरिकांनी दारू पिल्यानंतर डोळ्यांच्या आणि आरोग्याच्या समस्या आहेत. या सरकारने गेल्या दोन वर्षांत कोणतीही योजना आणलेली नाही. बनावट दारू विकणाऱ्यांवर कारवाई केली नाही. डीएमके सत्तेवर आल्यास दूध आणि मधाच्या नद्या वाहतील असे आश्वासन २०२१ च्या निवडणुकांपूर्वी दिले होते. परंतु आता फक्त दारू वाहत असल्याचा हल्लाबोल के पलानीस्वामी यांनी केला. दरम्यान आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी बनावट दारूचे सेवन केल्याने सुमारे 55 लोक आजारी पडल्यानंतर दोन जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या उपचारांवर लक्ष ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
पुद्दुचेरी येथून मिळवले रसायन : विषारी दारू पिल्याने 21 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण गंभीर आहे. या नागरिकांनी पुद्दुचेरी येथील एक व्यक्तीकडून हे मिथेनॉल हे रसायन घेतले होते. त्याचा वापर बनावट दारू करण्यासाठी केला जात होता. मिथेनॉल हे रसायन रंगहीन आणि ज्वलनशील द्रव असून ते औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते. मिथेनॉलमध्ये अल्कोहोलचा वास असतो, अशी माहिती पोलीस महासंचालक सी सिलेंद्र बाबू यांनी दिली. तामिळनाडूमध्ये अवैध दारूचे उत्पादन रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. मात्र काही व्यक्तींनी औद्योगिक परिसरामधून चोरलेले रासायनिक पदार्थ विकण्याचा अवलंब केला. हे मिथेनॉल कोणत्या औद्योगिक युनिटमधून चोरले आणि या प्रकरणात कोणाचा संबंध आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस महासंचालक सी सिलेंद्र बाबू यांनी दिली.
तामिळनाडूत अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा : तामिळनाडूत गेल्या वर्षी 1 लाख 40 हजार 649 दारूबंदीचे गुन्हे दाखल झाले असून 1 लाख 39 हजार 697 जणांना अटक करण्यात आली आहे. सुमारे 37 हजार 217 लीटर स्पिरिट आणि 2 हजार 957 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यावर्षी आतापर्यंत 55 हजार 474 गुन्हे दाखल झाले असून 55 हजार 173 जणांना अटक करण्यात आली आहे. सुमारे 2 लाख 55 हजार 078 लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले. बेकायदेशीर दारूची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 69 चारचाकी वाहनांसह 1 हजार 077 दुचाकी जप्त करण्यात आली असून गुंडा कायद्यांतर्गत 79 जणांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असल्याची माहितीही पोलीस महासंचालक सी सिलेंद्र बाबू यांनी दिली.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) तमिळनाडू सरकार आणि राज्य पोलीस प्रमुखांना विषारी दारू पिल्याने लोकांचा मृत्यू झाल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. बेकायदेशीर आणि बनावट मद्य विक्री आणि सेवन प्रतिबंधित करण्यात राज्य सरकार अयशस्वी ठरल्याचे आयोगाने या नोटीसमध्ये नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयोगाने तामिळनाडूचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावून चार आठवड्यात तपशीलवार अहवाल मागवला आहे.
हेही वाचा -