ETV Bharat / bharat

अॅलोपॅथी उपचार पद्धतीविरोधातील विधान मागे घ्या; आरोग्य मंत्र्यांचे रामदेव बाबांना पत्र - रामदेव बाबा

अॅलोपॅथी उपचार पद्धतीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी रामदेव बाबा यांना पत्र लिहले आहे. अॅलोपॅथी उपचार पद्धतीविरोधातील विधान मागे घ्या, असे त्यांनी पत्रात म्हटलं.

रामदेव बाबा- हर्ष वर्धन
रामदेव बाबा- हर्ष वर्धन
author img

By

Published : May 23, 2021, 8:04 PM IST

नवी दिल्ली - अॅलोपॅथी उपचार पद्धतीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर रामदेव बाबा अडचणीत आले आहेत. याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेत थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयालकडे दाद मागितली. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी प्रतिक्रिया दिली. रामदेव बाबा यांचे विधान निराशाजनक होते. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे, असे हर्षवर्धन म्हणाले.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी योगगुरु रामदेव यांना पत्र लिहून अ‍ॅलोपॅथीविरोधातील आपले आक्षेपार्ह विधान मागे घेण्यास सांगितले आहे. आरोग्य कर्मचारी दररोज देशवासियांसाठी कोरोनाविरोधात लढा देत आहेत. या विधानामुळे 'कोरोना योद्धा' यांच्या भावना दुखावल्या आहेत, असे हर्ष वर्धन म्हणाले.

अॅलोपॅथी औषधे आणि डॉक्टरांवरील तुमच्या विधानामुळे देशवासियांना मनापासून दु:ख झाले आहे. डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी कोरोनाविरूद्ध रात्रंदिवस लढा देत आहेत. आपल्या वक्तव्यामुळे आपण केवळ कोरोना योद्ध्यांचा अनादरच केला नाही. तर देशवासीयांच्या भावनांनाही दुखावले आहे. तुमच्याकडून जारी करण्यात आलेले स्पष्टीकरण लोकांच्या दुखलेल्या भावनांवर मलम लावण्यासाठी पुरेसे नाही, असे हर्ष वर्धन यांनी पत्रात म्हटलं.

अ‍ॅलोपॅथीचे औषध खाल्ल्यामुळे कोरोनाचे कोट्यवधी रुग्ण मरण पावले हे तुमचे म्हणणं दुर्दैवी आहे. कोरोना साथीच्या विरूद्ध हा लढा केवळ सामूहिक प्रयत्नांनी जिंकला जाऊ शकतो, हे आपण हे विसरू नये. डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून काम करत आहेत. ते कर्तव्य आणि मानवी सेवेबद्दलच्या त्यांच्या निष्ठेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, असे हर्ष वर्धन यांनी पत्रात म्हटलं.

काय म्हणाले रामदेव बाबा?

रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटलं. अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्ये केले. उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. हायड्रोक्लोरिक्विन फेल झालं. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरलं. लाखो लोकांचा मृत्यू अॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अॅलोपॅथीउपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे.

हेही वाचा - रामदेव बाबा यांच्या विधानाविरोधात आयएमएकडून थेट मोदींना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.