ETV Bharat / bharat

महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार - संजय राऊत - महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार वाटत असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut
author img

By

Published : Sep 21, 2021, 10:06 AM IST

नवी दिल्ली - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू ही गंभीर घटना आहे. त्यांच्या भक्तांची इच्छा आहे, की या संशयास्पद मृत्यूची चौकशी पाहिजे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून झाली पाहिजे. अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार वाटत असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

'महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे' -

पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्र सरकारवर मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता. उत्तर भारतातूनही चौकशीची मागणी झाली होती. महाराष्ट्र सरकारने त्या प्रकरणात निःपक्ष चौकशी करण्याचा प्रयत्न केला. तशाच पद्धतीने महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. सीबीआय मार्फत ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. शिवसेनेला हिंदूत्ववादी संघटना म्हणून महंत नरेंद्र गिरी यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यांचा संशयास्पद मृत्यू हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार वाटत असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदा अयोद्धेत आले होते, तेव्हा त्यांनी महंत नरेंद्र गिरी यांची भेट घेतली होती. त्यांचा आशीर्वाद हिंदूत्ववादी संघटना म्हणून शिवसेनेसोबत होता. त्यांची जेव्हा-जेव्हा भेट झाली, तेव्हा ते एक खंबीर व्यक्तीमत्व म्हणून भेटलेले आहेत. त्यामुळे त्यांचा असा संशयास्पद मृत्यू हा शंका निर्माण करणारा आहे. हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार वाटत असल्याचे राऊत यांनी म्हटले.

'ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राज्याच्या हिताचा' -

दरम्यान, राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अध्यादेश तो राज्याच्या हिताचा आहे. तसेच आम्ही बारा राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली आहे, ती देखील सर्वसमावेशक आहे, असेही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील सरकार पाच वर्षे चालणार असून अनंत गिते यांनी केलेल्या टिप्पणीवर उत्तर देण्याचे मात्र राऊत यांनी टाळले.

हेही वाचा - आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू, शिष्यासोबतचा वाद आणि इतिहास; वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.