फरीदाबाद : सध्या सूरजकुंड मेळा सुरू असून या मेळ्यात अनेक कलावंतांनी आपली कलाकुसर सादर केली आहे. यात ठेवण्यात आलेली राम दरबाराच्या पेंटींगची कलाकृती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या कलाकृतीची किंमतही तशीच तगडी आहे. तब्बल पाच कोटीची कलाकृती सूरजकुंड मेळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ही पेंटींग जयपूर येथील कलावंत गोपाल प्रसाद शर्मा यांनी बनवली आहे.
पेंटींगसाठी लागले पाच वर्ष : राम दरबाराची पेंटींग सध्या सूरजकुंड मेळ्यात सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. ही पेंटींग बनवायला गोपाल प्रसाद यांना तब्बल 5 वर्ष लागले. या पेंटींगमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा उपयोगही करण्यात आल्याची माहिती गोपाल प्रसाद शर्मा यांनी दिली आहे. त्यामुळे ही पेंटींग अधिकच आकर्षक दिसत असल्याची माहिती गोपाल प्रसाद यांनी दिली. राम दरबाराची ही पेंटींग पाहण्यासाठी म्हणूनच सगळ्या सूरजकुंड मेळ्याचे लक्ष लागल्याचे दिसत आहे.
पाच कोटीत देण्यास नकार : गोपाल प्रसाद शर्मा यांनी बनवलेल्या पेंटीगमध्ये राम दरबार स्पष्ट दिसत आहे. त्यात रामाचे तीन भाऊ, रामाची माता कौशल्या, रामभक्त हनुमान, अंगद यांच्सह स्वर्गाच्या अप्सरांनाही बारीकिने चित्रित करण्यात आले आहे. या पेंटीगचे विशेष म्हणजे यातील छोटे छोटे चित्रही स्पष्टपणे दिसत आहेत. या पेंटींगला खरेदी करण्यास मोठी मागणी आहे. तब्बल पाच कोटी रुपयात ही पेंटीग मागण्यात येत आहे. गोपाल प्रसाद यांनी ही अनोखी पेंटींग असल्याचे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला सांगितले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री पीयूश गोयल यांनीही पाच कोटीमध्ये ही पेंटींग खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र गोपाल प्रसाद यांनी त्यांनाही पेंटीग विकण्यास नकार दिला आहे.
पन्नास कोटीपेक्षाही अनमोल : केंद्रीय मंत्री पीयूश गोयल यांनी ही पेंटींग पाच कोटीत मागितली. मात्र गोपाल प्रसाद यांनी ती पेंटींग विकण्यास नकार दिला. त्यांच्यासरखेच इतर अनेक जण ही पेंटीग खरेदी करण्यास येत आहेत. तरीही गोपाल प्रसाद यांनी ही पेंटींग देण्यास नकार दिला आहे. या पेंटीगची किंमत पाच कोटी नाही, तर पन्नास कोटीपेक्षाही अनमोल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपण या पेंटींगमध्ये खूप बारीकीने ध्यान देऊन बनवल्याची माहितीही त्यांनी यावेळी त्यांनी यावेळी दिली.
मिळाले अनेक पुरस्कार : राम दरबार पेंटींग बनवणाऱ्या गोपाल प्रसाद शर्मा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित कऱण्यात आले आहे. अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. यात लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, स्टेट अवार्ड, नॅशनल पुरस्कारांसहीत अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. यासह त्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्तेही पुरस्कार मिळाल्याची माहिती गोपाल प्रसाद यांनी दिली. यासह गेल्या सहा वर्षापासून माझे नाव पद्मश्री पुरस्कारासाठी जात आहे. मात्र यावेळी आपल्याला पद्मश्री पुरस्कार नक्की मिळेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - Nana Patekar On Population : देशात पाण्यापेक्षाही वाढत्या लोकसंख्येचा धोका अधिक - नाना पाटेकर