ETV Bharat / bharat

Afzal Khan Tomb : अफझलखानच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, उद्या सुनावणी - Anand Dave of the Hindu Mahasabha

सुप्रीम कोर्टाने अफझलखानच्या थडग्याभोवती (Afzal Khan tomb) सरकारी जमिनीवर उभारलेल्या कथित अनधिकृत बांधकामांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. (illegal structures around Afzal Khan tomb).

Afzal Khan Tomb
Afzal Khan Tomb
author img

By

Published : Nov 10, 2022, 3:37 PM IST

Updated : Nov 10, 2022, 3:59 PM IST

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने अफझलखानच्या थडग्याभोवती (Afzal Khan tomb) सरकारी जमिनीवर उभारलेल्या कथित अनधिकृत बांधकामांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. (illegal structures around Afzal Khan tomb). सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने १६५९ च्या सुमारास दफन करण्यात आलेली अफझल खानची कबर वनजमिनीवर बांधली जात असल्याच्या कारणावरुन ती पाडण्यात येत असल्याच्या निवेदनाची दखल घेतली.

त्या जागेवर थडगे कसे तयार करू शकता? - "त्या जागेवर १९५९ मध्ये तुम्ही थडगे कसे तयार करू शकता', असा सवाल खंडपीठाने केला. मात्र, शुक्रवारी सुरू असलेल्या विध्वंसाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्याचे त्यांनी मान्य केले. महाराष्ट्रातील सातारा येथील प्रतापगड किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला होता. त्यानंतर त्याच्या स्मरणार्थ तेथे एक थडगे बांधण्यात आले होते. गुरुवारी पहाटे ते पाडण्याचे काम सुरू होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हिंदु महासंघाची कबर काढण्याची मागणी - प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरी भोवती अतिक्रमण करण्यात येत आहे. अफजलखानाची ही कबर सरकारने काढावी, अशी मागणी हिंदू ब्राह्मण महासंघाने सरकारकडे केली आहे. जर सरकारने अफजल खान आणि औरंगजेबाची कबर काढली नाही, तर हिंदू महासंघ कबर काढेल. महाराष्ट्रात अफजल खान आणि औरंगजेबाच्या कबरी हव्यात कशाला? त्यांचा इतिहास सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा अशी मागणी हिंदू महासभेचे आनंद दवे (Anand Dave of the Hindu Mahasabha) यांनी सरकारकडे केलेली आहे. हिंदू महासंघातर्फे पुण्यात होणाऱ्या दीपोत्सव कार्यक्रमात अफजलखान वधाचे बँनर लावले जाणार आहेत. पोलिसांनी बँनर लावण्याला विरोध केला असल्याची माहिती आनंद दवे यांनी दिली आहे.

Last Updated : Nov 10, 2022, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.