नवी दिल्ली : 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवार फेटाळली आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अधिवक्ता निजाम पाशा यांनी न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि न्यायमूर्ती बीव्ही नगररत्न यांच्या खंडपीठाला माहिती दिली की, चित्रपटाचा ट्रेलर एक कोटी 60 लाख वेळा पाहिला गेला आहे. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. अधिवक्ता पाशा म्हणाले, 'हा चित्रपट द्वेषयुक्त भाषणाचे सर्वात वाईट उदाहरण आहे. हा निव्वळ दृकश्राव्य प्रचार आहे असही ते यामध्ये म्हणाले आहेत.
अधिवक्ता सिब्बल म्हणाले की, जे आवश्यक असेल ते आम्ही करू : खंडपीठाने हा निर्णय देताना म्हटले आहे की, अनेक प्रकारची द्वेषयुक्त भाषणे आहेत. या चित्रपटाला प्रमाणपत्र मिळाले आहे आणि बोर्डाने त्याला मान्यता दिली आहे. कोणी स्टेजवर येऊन निंदा करायला सुरुवात केली, असे नाही. जर तुम्हाला रिलीजला आव्हान द्यायचे असेल तर चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आव्हान दिले पाहिजे. तेही योग्य माध्यमातून ते तुम्हाला करता येईल. यावर अधिवक्ता सिब्बल म्हणाले की, जे आवश्यक असेल ते आम्ही करू.
सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार : न्यायमूर्ती नगररत्न म्हणाले की, याचिकाकर्त्याने प्रथम उच्च न्यायालयात जावे. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्यामुळे वेळ नसल्याचे वकील पाशा यांनी सांगितले. खंडपीठाने सांगितले की, 'हे मैदान नाही. प्रत्येकजण असेच सर्वोच्च न्यायालयात येऊ लागेल. त्यामुळेच त्यांनी द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात हस्तक्षेप अर्ज दाखल केल्याचे पाशा यांनी सांगितले. विशेष म्हणजे हा चित्रपट धर्मांतरावर आधारित आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली असून, हा चित्रपट द्वेषयुक्त भाषणाला प्रोत्साहन देतो. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा : Char Dham Yatra: केदारनाथ धाममध्ये जोरदार बर्फवृष्टी! ३ मे रोजी होणारी यात्राही पुढे ढकलली