मुंबई : भारताचं चंद्रयान ३ नुकतंच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. त्यानंतर लोकांमध्ये चंद्राबद्दल आकर्षण निर्माण झालंय. आता आकाशात चंद्रासंबंधी आणखी एक खगोलीय घटना घडणार आहे. आज म्हणजेच बुधवार, ३० ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी आकाशात 'सुपर ब्ल्यू मून' दिसणार आहे.
सुपर ब्लू मून म्हणजे काय : जेव्हा एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला 'ब्लू मून' म्हणतात. या महिन्याच्या पहिल्या तारखेला पूर्ण चंद्र दिसला होता. आता याच महिन्यातील ३० तारखेला रात्री पुन्हा एकदा पूर्ण चंद्र दिसेल. यालाच 'ब्लू मून' म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यादिवशी पौर्णिमा येते, तेव्हा त्याला 'सुपरमून' म्हणतात. या दोन्ही घटना जर एकाच दिवशी घडल्या तर त्याला 'सुपर ब्लू मून' म्हणतात. ही फक्त एक खगोलीय घटना आहे, जी काही वर्षांच्या अंतराने घडत राहते. पुढील 'सुपर ब्लू मून' १० ते २० वर्षांनंतर दिसू शकतो.
- सुपर ब्लू मून कधी पाहायचा : 'सुपर ब्लू मून' ला पाहण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सूर्यास्तानंतरची. त्यावेळी चंद्र सर्वात सुंदर दिसतो. 'सुपर ब्लू मून'ला तुम्ही आज संध्याकाळी पाहण्यास सुरुवात करू शकता. रात्री ९:३० च्या दरम्यान तो ऐन भरात असेल. त्यानंतर तो रात्रभर पाहता येईल. विशेष म्हणजे, आज तुम्ही तुमच्या साध्या डोळ्यांनी चंद्राच्या आकारात आणि तेजात झालेला बदल सहज पाहू शकता.
- आज चंद्र निळा दिसेल का : सुपरमून दरम्यान, चंद्र पृथ्वीपेक्षा सुमारे १४ टक्के मोठा आणि ३० टक्के उजळ दिसतो. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, चंद्राचा आकार किंवा चमक बदलत नाही. पण त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे तो मोठा आणि चमकदार झाल्याचं जाणवतं. सुपर ब्लू मूनच्या दिवशी चंद्र मोठा आणि चमकदार दिसेल. परंतु तो निळा दिसणार नाही.
हे ही वाचा :