ETV Bharat / bharat

Old Pension Scheme : पहिल्या कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल - सुखविंदर सिंह सुक्खू - सुखविंदर सिंह सुक्खू

निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील जनतेला आश्वासन दिले होते की, काँग्रेसचे सरकार स्थापन होताच जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल. (Old Pension Scheme in Himachal). सुक्खू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच याबाबत घोषणा केली. (sukhvinder singh sukhu on old pension scheme)

Old Pension Scheme
Old Pension Scheme
author img

By

Published : Dec 11, 2022, 10:21 PM IST

सुखविंदर सिंह सुक्खू

शिमला : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी शपथविधी सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, "आम्ही निवडणुकीत 10 वचन दिले होते आणि आम्ही त्याची अंमलबजावणी करू. आम्ही पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार देऊ. आम्ही मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत". (Old Pension Scheme in Himachal).

जुनी पेन्शन योजना पूर्ववत केली जाईल : यासोबतच हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनीही पहिल्या कॅबिनेट बैठकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचे सांगितले. जुनी पेन्शन योजना पूर्ववत केली जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेस कोणत्याही राज्यात सत्तेवर येणार नाही, असे पूर्वी लोक म्हणायचे, पण आज आम्ही भाजपचा रथ रोखला आहे, असे देखील ते म्हणाले.

हिमाचल निवडणुकीत पेन्शन योजना मोठा मुद्दा : आत्ता झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत जुनी पेन्शन योजना एक मोठा निवडणूक मुद्दा होता. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील जनतेला आश्वासन दिले होते की, काँग्रेसचे सरकार स्थापन होताच जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल. सुक्खू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच याबाबत घोषणा केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.