पणजी - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील दुसऱ्या टप्प्यातील मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. या खाते वाटपामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सुदिन ढवळीकर यांना ऊर्जा खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सावंत सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील शपथविधी शनिवारी पार पडला होता. यावेळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सुदिन ढवळीकर यांच्यासह भाजपाच्या नीळकंठ हळर्णकर व सुभाष फळदेसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या तिन्ही मंत्र्यांना मंगळवारी त्यांच्या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या ढवळीकर यांना ऊर्जा, गृहनिर्माण आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा खाते. सुभाष फळदेसाई यांना समाजकल्याण पुराभिलेख आणि पुरातत्त्व तसेच नदी परिवहन खात्याची जबाबदारी देण्यात आली. तर नीळकंठ हळर्णकर यांना मच्छिमार कारखाने आणि बाष्पक तसेच पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली.
हेही वाचा - INS Vikrant Case : किरीट सोमैया यांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव