नवी दिल्ली - कोरोनाची दुसरी लाट असताना सीबीएसईकडून घेण्यात येणारी १२ वी बोर्डाची रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. या मागणीसाठी १२ वीच्या ३०० विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांना पत्र लिहिले आहे.
बारावी वर्गात शिकणाऱ्या सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांना पत्र लिहून ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती केली आहे. १२ वीची परीक्षा थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत, असे विद्यार्थ्यांनी पत्रात म्हटले आहे. वैकल्पिक असेसमेंट योजना उपलब्ध करावी, अशी विनंतीही विद्यार्थ्यांनी केली आहे.
हेही वाचा-दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकात मोठा बदल; सीबीएसईची माहिती
सीबीएसई परीक्षा घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही-
१२ वीची परीक्षा घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्याचे नुकतेच केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी २३ मे रोजी सांगितले होते. सरकारकडून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचेही केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी म्हटले होते.
हेही वाचा-सीबीएसई बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत फेरविचार करा, राहुल गांधींचे टि्वट