गुवाहाटी - आसाममधील एका महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना वर्गात अश्लिल कृत्य करताना आढळून आले. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कॉलेजच्या 11वीच्या वर्गातील मुलामुलींचा एक गट एकमेकांना मिठी मारून वर्गात एकमेकांची चेष्टा करत होता. त्याच वर्गातील आणखी एका विद्यार्थ्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला. नंतर तो सोशल मीडियावर अपलोड केला.
ही घटना राज्यातील सिलचरच्या रामानुज गुप्ता कॉलेज या खासगी संस्थेतील आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनावर सडकून टीका केली. काहींनी कॉलेज प्रशासनावरही आरोप केले. हा व्हिडिओ बुधवारी कॉलेज अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर 7 विद्यार्थ्यांना कॉलेजमधून निलंबित करण्यात आले. सातपैकी चार मुली आणि तीन मुले आहेत.
कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना नोटीस बजावली आहे की ते अश्लील कृत्यांमध्ये स्पष्टपणे सहभागी आहेत. त्यामुळे संस्थेच्या शिस्तीचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे अशी चूक करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनिश्चित काळासाठी वर्गात हजर राहण्यापासून निलंबित करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य पूर्णदीप चंदा यांनी सांगितले की, मधल्या सुट्टीत शिक्षक उपस्थित नसताना विद्यार्थ्यांनी हे घृणास्पद कृत्य केले. आमच्याकडे कॉलेज कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून कॅम्पसमध्ये मोबाईल फोनलाही बंदी आहे. ते पुढे म्हणाले की हे विद्यार्थी इयत्ता 11वीच्या नवीन बॅचचे आहेत. त्यांना कॉलेजमध्ये येऊन फक्त 15 दिवस झाले आहेत.
कॉलेज प्रशासनाने त्या सात विद्यार्थ्यांच्या पालकांनाही बोलावून घेतले. कॉलेज आणखी कडक कारवाई करू शकते आणि विद्यार्थ्यांची संस्थेतून हकालपट्टी होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - Man beaten woman, महिलेला नग्न करुन बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल