पालमपुर कारगिलच्या युद्धात देशासाठी आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिलेले कॅप्टन विक्रम बात्रा यांचे पुण्यस्मरण. (7 जुलै 1999) या दिवशी कारगिल युद्धात त्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. ( Kargil war hero Vikram Batra ) कारगिलची शिखरे आणि पाकिस्तानी त्याला शेरशाह या नावाने ओळखतात, आई-वडिलांच्या हृदयातील प्रेम आणि जगासाठी अजरामर झालेले नाव म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. जो शत्रूला उडवल्यावर 'ये दिल मांगे मोर' म्हणत असे. विक्रम बत्रा यांची आज पुण्यतिथी आहे. अवघ्या 24 वर्षात त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्याविषयी ही महिती-
लव-कुश म्हटले जात असे - विक्रम बत्रा यांचा जन्म (९ सप्टेंबर १९७४) रोजी पालमपूरच्या घुग्गर गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जीएल बत्रा आणि आईचे नाव कमलकांता बत्रा आहे. ( Captain Vikram Batra Death anniversary ) दोन मुलींनंतर बत्रा दाम्पत्याला मुलगा हवा होता. देवाने त्यांच्या झोळीत दुहेरी आनंद ठेवला आणि कमलकांत बत्रा यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला ज्यांना प्रेमाने लव-कुश म्हटले जात असे. विक्रम हा मोठा होता ज्याला लव आणि लहान भाऊ विशाल कुश म्हणून हाक मारायचे.
पालमपूरची ओळख विक्रम बत्रा - आई शिक्षिका होती, त्यामुळे बत्रा ब्रदर्सचे शिक्षण घरातूनच सुरू झाले होते. डीएव्ही स्कूल पालमपूर येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी डीएव्ही चंदीगड येथून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन सहकारी आणि शिक्षक आजही त्यांचे स्मितहास्य, धैर्य आणि त्यांचा मनमिळावू स्वभाव लक्षात ठेवतात. आज पालमपूरची ओळख विक्रम बत्रा यांच्यामुळे होते आणि पालमपूरचा प्रत्येक माणूस कॅप्टन विक्रम बत्राचा चाहता आहे.
1995 मध्ये IMA परीक्षा उत्तीर्ण केली - विक्रम बात्रा यांची हाँगकाँगमधील एका शिपिंग कंपनीत मर्चंट नेव्हीमध्ये निवड झाली होती. ट्रेनिंगचा फोनही आला होता पण त्यांनी सैन्याचा गणवेश निवडला. देशासाठी प्राणांची आहुती देण्याच्या भावनेसमोर मर्चंट नेव्हीचा लाखोंचा पगार बटू ठरला. विक्रमचे वडील जीएल बत्रा म्हणतात की एनसीसी कॅडेट म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणे हे विक्रमच्या सैन्याकडे झुकण्याचे पहिले पाऊल होते. मर्चंट नेव्हीचे लाखोंचे पॅकेज सोडून, विक्रम बत्रा यांनी काहीतरी मोठे करण्याचा निर्णय घेतला आणि (1995 मध्ये IMA परीक्षा उत्तीर्ण केली.
मी तिरंगा फडकावून येईन - विक्रम बत्रा यांनी मित्रांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. कारगिल युद्धाच्या काही वेळापूर्वी विक्रम बत्रा त्यांच्या घरी आले होते. त्यानंतर तेथील नुगल कॅफेमध्ये त्याने आपल्या मित्रांना पार्टी दिली. संवादादरम्यान त्याचा एक मित्र म्हणाला की, तू आता सैनिक झाला आहेस, स्वत:ची काळजी घे. त्यावर विक्रम बत्राचे उत्तर होते, 'काळजी करू नका, मी तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात लपेटून येईन, पण नक्की येईन.'
'ये दिल मांगे मोर' - कारगिलच्या युद्धात विक्रम बत्राचे सांकेतिक नाव शेरशाह होते आणि याच सांकेतिक नावामुळे पाकिस्तानी त्यांना शेरशाह म्हणत. 5140 चे शिखर जिंकण्यासाठी रात्रीच्या अंधारात शत्रूची नजर चुकवून डोंगराची खडी चढाई करावी लागली. विक्रम बत्राने आपल्या साथीदारांसह टेकडीवर ताबा मिळवला, पाकिस्तानला धूळ चारली आणि ती चौकी ताब्यात घेतली. विजयानंतर विक्रम बत्राचा आवाज वायरलेसवर गुंजला 'ये दिल मांगे मोर'
पाकिस्तानला संपवल्यानंतर त्यांना युद्धभूमीवर कॅप्टन म्हणून बढती मिळाली - कारगिल युद्धादरम्यान 5140 चे शिखर काबीज केल्यानंतर 'ये दिल मांगे मोर' म्हणत विक्रम बत्रा देशाचा खरा हिरो बनला. दुसर्या दिवशी एका टीव्ही चॅनलवर विक्रम बत्रा यांनी ये दिल मांगे मोर म्हटल्यावर देशातील तरुणांमध्ये जणू उत्साह संचारला होता. कारगिलला पोहोचले तेव्हा विक्रम बत्रा लेफ्टनंट होते, पण 5140 च्या शिखरावरून पाकिस्तानला संपवल्यानंतर त्यांना युद्धभूमीवर कॅप्टन म्हणून बढती मिळाली आणि आता ते कॅप्टन विक्रम बत्रा होते.
शिखरावर तिरंगा फडकवण्याचे मिशन होते - 5140 च्या शिखरावर विजय मिळवल्यानंतर भारतीय सैन्याचा उत्साह आणखीनच उंचावला. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. 5140 वर तिरंगा फडकवल्यानंतर तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्हीपी मलिक यांनी स्वत: फोनवर त्यांचे अभिनंदन केले. यानंतर 4875 च्या शिखरावर तिरंगा फडकवण्याचे मिशन होते. त्या वेळी कॅप्टन विक्रम बत्रा आजारी होते, असे म्हटले जाते. परंतु, असे असतानाही त्यांनी या मोहिमेवर जाण्यासाठी वरिष्ठांकडे परवानगी मागितली.
4875 चे शिखर भारतीय सैन्याने जिंकले - लष्कराच्या प्रत्येक जवानाला शपथ दिली जाते की, रणांगणात तो आधी देशाचा विचार करेल, मग आपल्या साथीदारांचा आणि शेवटी स्वतःचा आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ही शपथ पाळली. 4875 च्या मोहिमेदरम्यान, विक्रम बत्राच्या एका साथीदाराला गोळी लागली, जी थेट शत्रूच्या बंदुकांच्या लक्ष्यावर होती. जखमी साथीदाराला वाचवताना, कॅप्टन विक्रम बत्रा यांना शत्रूने गोळ्या घातल्या आणि कारगिल युद्धातील तो महान नायक शहीद झाला. 4875 चे शिखर भारतीय सैन्याने जिंकले आणि आज हे शिखर बत्रा टॉप म्हणून ओळखले जाते.
तिरंग्यात लपेटून पालमपूरला परतले - विक्रम बत्रा यांनी एकदा सांगितले होते ते माझी काळजी करु नका मी एकतर तिरंगा फडकावून येईल किंवा तिरंग्यात गुंडाळून येईल. पण वापस नक्की येणार. अखेल, कारगिलच्या युद्धात शूर कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 5140 ला तिरंगा फडकवला आणि त्यानंतर 4875 च्या मिशनमध्ये ते देशासाठी शहीद झाले. विक्रम बत्रा यांनीही तिरंगा फडकावला आणि तिरंग्यात लपेटून पालमपूरला परतले हा तो दिवस-
हेही वाचा - Farooq Abdullah : 'हर घर तिरंगा' मोहिमेवर फारूक अब्दुल्ला चिडले.. म्हणाले, 'तिरंगा तुमच्याच घरात ठेवा'