सिलीगुडी (प. बंगाल) : पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर पुन्हा दगडफेक करण्यात आली आहे. पूर्व भारतातील पहिल्या वंदे भारत सेमी बुलेट ट्रेनवर पाचव्यांदा दगडेक झाली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनापासून या ट्रेनवर वारंवार हल्ले होत आहेत. या आधी वंदे भारत एक्सप्रेसवर बिहारमधील मालदा येथे देखील दगडफेक झाली होती.
बिहारमधून दगडफेकीचा अंदाज : रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधून दगडफेक झाल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. शुक्रवारी दुपारी 4.51 च्या सुमारास वंदे भारत एक्स्प्रेसच्या 22302 डाउन सी-06 च्या रूम सी-06 च्या सीट क्रमांक 70 मधील एका प्रवाशाने रेल्वे सुरक्षा कर्मचार्यांना माहिती दिली की, सुमारे 4.25 च्या सुमारास दालखोला आणि तेलटा दरम्यान ट्रेनच्या खिडकीवर दगडफेक करण्यात आली. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे पश्चिम बंगाल मधील रेल्वे प्रशासन चिंतेत आहे.
विशाखापट्टणममध्ये दगडफेक : 11 जानेवारीला आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीची घटना घडली होती. या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेसची देखभाल सुरू होती तेव्हा ही घटना घडली. ट्रेनवर झालेल्या दगडफेकीत खिडकीच्या काचा फुटल्याचा दावा रेल्वेने केला. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले. त्यादिवशी ट्रायल रन संपल्यानंतर, वंदे भारत ट्रेन विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून कांचरापालम येथील रेल्वे देखभाल केंद्राकडे जात होती. त्यामुळे ट्रेनमध्ये प्रवासी नव्हते.
बिहारमध्येही दगडफेक : 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हावडा-NJP वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर ३ जानेवारीला काही लोकांनी या ट्रेनवर दगडफेक केली. रेल्वे प्रशासनाने ही घटना गांभीर्याने घेतली. या घटनेने राजकीय वर्तुळात भूकंप झाला होता. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील होते. त्या आठवड्याच्या सुरुवातीला बिहारमधील मालदाजवळ हावडा ते न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करून एक्सप्रेसच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. मालदामध्ये प्रवेश करण्यापूर्वी बिहारमधील बारसुई स्टेशन ओलांडल्यानंतर मालदाजवळ वंदे भारतवर दगडफेक करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजता डाऊन गाडीच्या सी-11 रुमवर दगडफेक झाली होती.
हेही वाचा : Vande Bharat Express Security : दगडफेकीच्या घटनांनंतर वंदे भारत एक्सप्रेसची सुरक्षा वाढवली