शेअर बाजारामध्ये सलग दुसऱ्या दिवशी प्रारंभीच्या सत्रात पडझड बघायला मिळाली. विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर विक्रीवर भर दिल्याने शेअर बाजाराचा निर्देशांक प्रारंभीच्या सत्रात 283 अंकांनी कोसळून 55,483 अंकावर आला. निफ्टीतही 88 अंकांची घसरण होऊन तो 16,542 अंकावर आला. सोमवारीही प्रारंभीच्या सत्रात निर्देशांक खालच्या दिशेने सरकला होता.
शेअर बाजारात डॉ. रेड्डीज लॅब, नेस्ले, इन्फोसिस, एशियन पेंट्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. तर बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स वधारल्याचे दिसून आले.
सोमवारीही बाजारात सकाळच्या सत्रात निर्देशांक 225 अंकांनी खाली आला होता. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 3 टक्क्यांनी खाली आले होते. जूनच्या तिमाहित कंपनीने 46 टक्के फायदा होऊनही रिलायन्सचे शेअर्स आज 3 टक्क्क्यांनी खाली आले होते. याशिवाय सन फार्मा, टेक महिंद्रा, नेस्ले, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि आयटीसी या कंपन्यांच्या शेअर्सनाही फटका बसला होता.
हेही वाचा - Amazon Prime Sale Day : या वयातील लोकांना मिळणार विशेष ऑफर, 2 दिवसांच्या सेलचा तुम्ही देखील घेऊ शकता लाभ